पालघर येथे होणार स्पर्धा कणकवली | उमेश परब : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने पालघर येथे राज्यस्तरीय वरिष्ठ गट (सिनिअर) तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सिंधुदुर्गचा संघ सहभागी होणार आहे. त्यासाठी संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धा कणकवली येथील कंझ्यूमर्स सोसायटीच्या सभागृहात रविवारी झाली. या स्पर्धेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तायक्वांदो खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या उदघाटनाच्यावेळी जेष्ठ क्रीडा शिक्षक अच्युत वणवे, जिल्हा अथॅलेटिक असोसिएशनचे सहसचिव समीर राऊत, जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे सचिव भालचंद्र कुळकर्णी, देवगड तालुका तायक्वांदो असोसिएशन सचिव शेवंता नाईक, राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक एकनाथ धनवटे, जयश्री कसालकर, सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष नितीन तावडे, प्रशिक्षक साईप्रसाद दळवी, कुडाळ तालुका तायक्वांदो सचिव ओंकार सावंत, अविराज खांडेकर, नागराज चौगुले, सौरभ आचरेकर आदी उपस्थित होते. यावेळी निवडण्यात आलेल्या खेळाडूंचा संघ पालघर येथे होणाऱ्या राज्यस्पर्धेत सहभागी होणार आहे. हे निवड झालेले खेळाडू पुढील प्रमाणे आहेत. मुले- सौरभ आचरेकर, श्रेयश जाधव, अविराज खांडेकर, दर्शन धुरी, मंदार परब. मुली – सेजल पाटील, भाग्यश्री कसालकर, स्नेहा पाटील, नुरेमुबी अन्सारी, अंगारकी राणे, नायला नाईक, श्रावणी राणे, जान्हवी बाकरे. या सर्व विजेत्या खेळाडूंचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदेश पारकर, उपाध्यक्ष राजश्री धुमाळे, कोषाध्यक्ष तथा तायक्वांदो राष्ट्रीय प्रशिक्षक सुधीर राणे यांनी अभिनंदन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. – फोटो ओळ – पालघर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट तायक्वांदो स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा संघाची निवड रविवारी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक भालचंद्र कुलकर्णी , एकनाथ धनवटे, शेवंता नाईक आदी उपस्थित होते.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -