कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली वागदेतल्या गोपुरी आश्रम येथे काल ९ सप्टेंबरला ‘ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या’ सर्वसाधारण सभेत पदाधिकारी व सदस्य यांच्या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले.
सर्वसाधारण सभा कणकवली गोपुरी पर्यटन निवास केंद्र या ठिकाणी संपन्न झाली. या सभेला प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व सिने कलाकार अभयजी खडपकर उपस्थित होते. या वेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे पदाधिकारी व सदस्य यांची ओळख पत्रं (आयडी. कार्ड )रात्रीस खेळ चाले” तसेच आता झी मराठीवरील सिरीयल “नवा गडी नवं राज्य” फेम “आबा” म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते, निवेदक श्री. अभय खडपकर व महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री.बाळासाहेब मोहिते तसेच कोकण विभागीय अध्यक्ष श्री.संतोष नाईक यांच्या हस्ते वितरित करण्यात आली .
तसेच मालवण तालुका संघटनेचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल मालवण तालुका पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते व खडपकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सौ. प्रेरणा जुवेकर यांचा वाढदिवस संघटनेच्या वतीने साजरा करण्यात आला.
कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी आपल्या मनोगतामध्ये संघटनेच्या उत्कृष्ट कार्याचा अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष मंदार काणे, जिल्हा सचिव अर्जुन परब, जिल्हा सल्लागार प्रकाश तेंडुलकर, जिल्हा संघटक डॉक्टर वैभव आईर, जिल्हा महिला संघटक सौ. मिनल पार्टे, जिल्हा निरीक्षक सौ. मानसी परब, तसेच सर्व तालुका अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.