मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : शासकीय तंत्रनिकेतन मालवण मध्ये औद्योगिक तज्ञ मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. प्रदीप शेवाडे (ओंकार प्रॉडक्ट्स माजगाव, सावंवाडी ), तसेच श्री. विद्येश रांगणेकर (समर्थ कॅशू प्रोसेसिंग माजगाव, सावंवाडी) हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन मालवण मधील अन्न तंत्रज्ञान या विभागामार्फत विभागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थी व मार्गदर्शक यांच्यात चर्चारुपी संवाद झाला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा सुरु करावा याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच सुरू करतेवेळी व व्यवसाय सुरू करून झाल्यावर कोणकोणत्या आव्हानांना समोर जावं लागतं याचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन मिळाले. सदर कार्यक्रमास संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद नारकर या विद्यार्थ्यांने केले. कार्यक्रमास अन्न तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख श्री. प्रकाश शिरहट्टी, वरिष्ठ शिक्षक श्री. संजय तलवारे व श्री. गणेश सामंत उपस्थित होते.
शासकीय तंत्रनिकेतन मालवण येथे विद्यार्थ्यांना यशस्वी औधोगिक धेय्यप्राती मार्गदर्शन शिबीर!
52
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -