24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

वेंगुर्लेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एस टी कामगार संघटनेत ६० कर्मचाऱ्यांचा प्रवेश ; संजय गावडे यांची अध्यक्षपदी निवड.

- Advertisement -
- Advertisement -

जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी नविन सभासदांचे केले स्वागत व अभिनंदन.

वेंगुर्ले | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वेंगुर्ला आगार एस. टी कामगार सेना संघटना कार्यकारिणीच्या निवडीच्या सभेत अध्यक्ष पदी सक्रिय व क्रियाशील कार्यकर्ते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख संजय गावडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

वेंगुर्ल्यातील ठाकरे शिवसेनेच्या सुंदरभाटले इथल्या तालुका मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या अध्यक्षतेखाली ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ला आगार एस.टी. कामगार सेना संघटना कार्यकारीणीची निवड सभा संपन्न झाली. या सभेत एकमताने वेंगुर्ला आगार एस. टी कामगार सेना संघटना कार्यकारीणीची निवड करण्यात आली. यात संघटनेच्या अध्यक्षपदी संजय गावडे, उपाध्यक्षपदी नारायण होळकर, सचिवपदी मार्टीन डिसोजा, सहसचिवपदी विशाल पेडणेकर, खजिनदार पदी गौरेश राणे व विवेक नबार, सहखजिनदारपदी अभि परब, महिला संघटकपदी निहारीका होळकर व धनश्री तांडेल कायदेशीर सलगारपदी अँड जी. जी. टांककर विभागीय कार्यकारीणी सदस्यपदी अनंत नाईक, मनोज दाभोलकर, एस. ओ. काझी, उदय चिपकर तर सदस्यपदी योगेश बोवलेकर, राहुल आरोलकर, गुरूप्रसाद गावडे, अक्षय येसाजी, एस. डी. राणे, रोहिदास कामत, नंदू दाभोलकर, एस. व्ही. राऊळ, सत्त्यवान राऊळ, डी. एस. पालकर, डी. सी. मुळीक, श्री. सनगर, अजित पाटील अनिल देसाई, अमित खुर्दळ, के. एम. अनासरे, संतोष कुंभार, सत्ताप्पा रासम, विवेक नवार, संदिप चिचकर, राजन अणसुरकर यांचा समावेश आहे.

यावेळी व्यासपिठावर उपस्थित ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांत जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, सिंधुदुर्ग जिल्हा आगार संघटना जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, जिल्हा सचिव भगवान धुरी, वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहर प्रमुख अजित राऊळ, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख तुषार सापळे, अनंत नाईक, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, अभि मांजरेकर, दिलीप राणे, अल्पसंख्यांक सेलचे तालुका प्रमुख रफिक बेग, संदिप पेडणेकर, संजू किनळेकर, वैभव फटजी, आनंद बटा यांचा समावेश होता.

बाळासाहेबांनी शिवसेना पक्षाची स्थापना हि सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी सर्वसामान्य जनता, शेतकरी व कामगार यांचेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्यामुळे जनता, शेतकरी व कामगारांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या वेंगुर्ला आगार एस. टी. कामगार सेना संघटनेत अन्य संघटनेतून प्रवेश केलेल्या ६० एस. टी. कामगारांचे जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पडते यांनी स्वागत व अभिनंदन केले. यावेळी जिल्हा समन्वयक बाळा गावडे, तालुका प्रमुख यशवंत परब व माजी प्रमुख तुषार सापळे यांनी या समेत ठाकरे शिवसेनेचे कार्य याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी तुषार सापळे यांनी आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!