‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेला कणकवलीत मिळाला भरघोस प्रतिसाद.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षा तर्फे काल २७ ऑगस्टला नारळी पोर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन सध्या महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ मालिकेतील ‘गांवमामी’ उर्फ अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी व जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेतील महिला गटात रेश्मा वनस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर पुरुष गटात प्रणय गुरसाळे यांनी बाजी मारली. ही स्पर्धा कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संपन्न झाली. या स्पर्धेला महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हा प्रमुख शेखर राणे, सचिव किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख भूषण परुळेकर, उपतालुकाप्रमुख सुनिल सावंत, दामू सावंत, तालुका समन्वयक सुनील पारकर, सुनील हरमळकर, कुडाळ तालुका प्रमुख बंडू तुळसकर, महिला तालुका प्रमुख सिद्धी शिरसाट, कणकवली महिला तालुका प्रमुख प्रिया टेंबकर, शहर प्रमुख बाळू पारकर, भास्कर राणे, कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.