भाजप कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी मालवण तहसीलदार यांना दिले निवेदन.
मालवण | सुयोग पंडित : भाजपा कोकण विकास आघाडी मुंबई सचिव सुरेश बापर्डेकर यांनी मालवण तालुक्यातील रास्त धान्य दुकानात मिळत असलेली करड आणि तांदूळ यापासून त्रस्त ग्राहक नागरिक यांची समस्या अत्यंत बिकट होत चालली आहे ती त्वरित निकालात काढावी अशी मागणी मालवण तहसीलदारांना काल एका निवेदनाद्वारे केली. याबाबत लवकर विचार विनिमय होऊन कारवाई करण्यात यावी अशी आग्रही विनंती. मालवण तालुक्यातील रास्त धान्य वितरण दुकानानी गेले कित्येक महिने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून मोफत धान्य वितरण करण्यात येत आहे त्याबद्दल ग्राहक नागरीक यांच्यातर्फे मनःपूर्वक आभार मानले परंतु गेले कित्येक महिने मालवण तालुक्यातील रास्त धान्य दुकानानी अर्धे तांदूळ आणि अर्धी तांदळाची करड दिली जाते . यामुळे सध्या नागरिक बऱ्याच विवंचनेत आहेत मिळत असलेली करड करायची काय ? किती खायची किती निवडायची आणि किती साठवून ठेवायची याला प्रमाण आहे. जास्त साठवून त्याला टोका आणि छोटे छोटे किडे पडले की ते फेकून द्यावे लागत आहेत. नागरिकांना हे धान्य जरी मोफत असले तरी प्रत्यक्षात शासन विकतच घेते त्यामुळे त्याचा अपव्यय होत असल्याने सरळ तांदूळच द्यावेत असे बापार्डेकर यांनी त्यांच्या निवेदनात नमूद केले आहे. इतरत्र कुठेही काही मिळो आमच्या मालवण तालुक्यातील सर्व रास्त धान्य वितरण दुकानात सर्वच्या सर्व तांदूळ वितरीत करण्यात यावे जेणेकरून गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आत्ता पासून तांदूळ वितरीत करून नागरिकांसमोर निर्माण झालेली करड तांदूळ समस्या दूर करावी वअसे केल्यास पूर्वी प्रमाणे मोफत धान्य घेणारी ग्राहक सर्वच तांदूळ दिल्यानी समाधानी राहतील असे बापार्डेकर यांनी सांगितले आहे.
या मागणीची तात्काळ कारवाई करण्यात येऊन ग्राहकांना गणपती पासून सर्व तांदूळ वितरीत करण्यात यावे .याचा आदेश काही दिवसात काढून त्याची लवकरात लवकर अमंलबजावणी करावी व तसे न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल ही आगाऊ सूचना करत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यापूर्वीच संबंधीत आदेश निघेल अशी अपेक्षा आहे अशी आशा सुरेश बापर्डेकर यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे.