27.8 C
Mālvan
Thursday, November 14, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

आगामी काळात भाजपात जास्तीत जास्त संख्येने पक्षप्रवेश होतच रहाणार आणि ‘निलेश राणे विजय संकल्प अभियान’ यशस्वी होणार : तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक भयग्रस्त झाल्याचाही केला दावा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ भाजपा नेते धोंडी चिंदरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार वैभव नाईक तसेच मनसे पक्ष यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. काल २७ ऑगस्टला मालवण कुंभारमाठ येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पत्रकार परीषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासकामांसाठी भरघोस मदत येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भाजपाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डाॅ निलेश राणे व इतर सर्व सक्षम कार्यकर्ते व पदाधिकारी यांची फौज अतिशय वेगाने कामे करत असल्याने डाॅ. निलेश राणे यांच्यासाठी ‘निलेश राणे विजय संकल्प अभियान’ हे राबविले जाणार असून त्यात प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना गांवागांवातून त्यांच्या जबाबदारी प्रमाणे अतिशय उत्तम काम घडणार व ते अभियान यशस्वी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गाचे काम रखडले हे मान्य आहे हे सांगताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मनसेवर निशाणा साधत म्हणले की मागील उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महामार्गाचा हा प्रश्न मनसेने का नाही लावून धरला आणि आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यात लक्ष घालून काम करत आहेत तेंव्हा मनसे टीका करत आहे. केवळ सोशल मिडिया वर टीका करणे म्हणजे दगड मारुन पळून जाण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला.
भाजपातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या इनकमिंग पक्ष प्रवेशांमुळे मुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे भयग्रस्त झाल्याचाही त्यांनी दावा केला आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा बॅन्क संचालक व भाजपा नेते बाबा परब, माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, माजी नगरसेविका पूजा सरकारे, अशोक चव्हाण, दीपक सुर्वे, विजय निकम, संतोष गांवकर, मकरंद राणे, भा.ज .यु. मो. तथा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सुमीत सावंत, प्रवीण घाडीगांवकर, राजेश तांबे, रवी टेंबुलकर, यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक भयग्रस्त झाल्याचाही केला दावा.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ भाजपा नेते धोंडी चिंदरकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आमदार वैभव नाईक तसेच मनसे पक्ष यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे. काल २७ ऑगस्टला मालवण कुंभारमाठ येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये पत्रकार परीषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासकामांसाठी भरघोस मदत येत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या भाजपाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार डाॅ निलेश राणे व इतर सर्व सक्षम कार्यकर्ते व पदाधिकारी यांची फौज अतिशय वेगाने कामे करत असल्याने डाॅ. निलेश राणे यांच्यासाठी 'निलेश राणे विजय संकल्प अभियान' हे राबविले जाणार असून त्यात प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांना गांवागांवातून त्यांच्या जबाबदारी प्रमाणे अतिशय उत्तम काम घडणार व ते अभियान यशस्वी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महामार्गाचे काम रखडले हे मान्य आहे हे सांगताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मनसेवर निशाणा साधत म्हणले की मागील उद्धव ठाकरे सरकारच्या काळात महामार्गाचा हा प्रश्न मनसेने का नाही लावून धरला आणि आता पालकमंत्री रवींद्र चव्हाण त्यात लक्ष घालून काम करत आहेत तेंव्हा मनसे टीका करत आहे. केवळ सोशल मिडिया वर टीका करणे म्हणजे दगड मारुन पळून जाण्यासारखे असल्याचा टोला त्यांनी लगावला.
भाजपातील कार्यकर्त्यांच्या मोठ्या इनकमिंग पक्ष प्रवेशांमुळे मुळे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक हे भयग्रस्त झाल्याचाही त्यांनी दावा केला आहे.

या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्यासमवेत जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, ज्येष्ठ पदाधिकारी विलास हडकर, जिल्हा बॅन्क संचालक व भाजपा नेते बाबा परब, माजी नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी वित्त बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण, माजी उपसभापती राजू परुळेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, माजी नगरसेविका पूजा सरकारे, अशोक चव्हाण, दीपक सुर्वे, विजय निकम, संतोष गांवकर, मकरंद राणे, भा.ज .यु. मो. तथा युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सुमीत सावंत, प्रवीण घाडीगांवकर, राजेश तांबे, रवी टेंबुलकर, यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!