डेगवे मोबाईल टाॅवरची बॅटरी भारत संचार निगमने बसवली .
बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे येथील विजय देसाई यांच्या लढ्याला यश आले असून डेगवे मोबाईल टाॅवरची बॅटरी भारत संचार निगमने बसवली गेली. त्यामुळे डेगवे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
डेगवे गांवात भारत संचार निगम, सावंतवाडी यांनी मोबाईल मनोरा उभारला होता. या मनो-राच्या बॅटरीची अज्ञातांनी चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला होता. याबाबतीत गांवातील ग्रामपंचायत, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती.
भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ऑगस्टला या कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई व डेगवे ग्रामस्थ बसले होते. यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक मा आर. व्ही. जन्ही यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. १५ दिवसांपूर्वी हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी हमी पत्र उपोषणाच्या दिवशी दिले होते. त्यामुळे उपोषण त्वरित मागे घेतले होते. संबंधित अधिकारी यांनी सत्वर दखल घेऊन गुरुवारी अखेर संबंधित अधिकारी यांनी डेगवे गावातील मोबाईल मनो-याची बँटरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांचे तसेच याकामात पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे, लोकप्रतिनिधींचे व पत्रकार बंधूचे मनापासून आभार डेगवे ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांनी व्यक्त केले आहेत.