24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरेत युवासेनेच्या नारळ लढवणे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद ; १५० स्पर्धक झाले सहभागी.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभागाच्या वतीने नारळ लढवने स्पर्धा मसुरे देऊळवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला युवकांचा प्रचंड प्रतीसाद मिळाला या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाला ५ नारळ देऊन स्पर्धा आयोजित केली गेली. यावेळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मुंबई मनपा सुधार समिती माजी अध्यक्ष व वांद्रे विधानसभा प्रमुख सदा परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. युवासेना जिल्हा प्रमुख व कुडाळ चे उपनगराध्यक्ष युवासेना सचिव मंदार शिरसाट व मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम मंदार केणी यांनी नारळ लढवून स्पर्धेस सूरुवात केली. स्पर्धेचे प्रथम मानकरी किरण मेस्त्री यांना रोख रू ५००० व चषक आणि द्वितीय मानकरी भार्गव वरक यांना रोख रू ३००० व चषक देण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्यात युवासैनिकांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मसुरे विभाग प्रमुख राजेश गांवकर, गोळवण विभाग प्रमुख भाऊ चव्हाण, रेवंडी सरपंच अमोल वस्त, संदीप महाडेश्वर, उपतालुका प्रमुख युवासेना अमित भोगले , युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, युवासेना शाखा प्रमुख पप्पू परब, किशोर कासले, निलेश मालवणकर, आयवन फर्नांडिस, बाबू आंगणे, तनुराज आंगणे व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून युवासेना मसुरे विभागाच्या वतीने नारळ लढवने स्पर्धा मसुरे देऊळवाडा येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला युवकांचा प्रचंड प्रतीसाद मिळाला या स्पर्धेत १५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. प्रत्येक स्पर्धकाला ५ नारळ देऊन स्पर्धा आयोजित केली गेली. यावेळी स्पर्धेचे प्रमुख पाहुणे मुंबई मनपा सुधार समिती माजी अध्यक्ष व वांद्रे विधानसभा प्रमुख सदा परब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. युवासेना जिल्हा प्रमुख व कुडाळ चे उपनगराध्यक्ष युवासेना सचिव मंदार शिरसाट व मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम मंदार केणी यांनी नारळ लढवून स्पर्धेस सूरुवात केली. स्पर्धेचे प्रथम मानकरी किरण मेस्त्री यांना रोख रू ५००० व चषक आणि द्वितीय मानकरी भार्गव वरक यांना रोख रू ३००० व चषक देण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांच्यात युवासैनिकांच्या उपस्थितीत हा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी मसुरे विभाग प्रमुख राजेश गांवकर, गोळवण विभाग प्रमुख भाऊ चव्हाण, रेवंडी सरपंच अमोल वस्त, संदीप महाडेश्वर, उपतालुका प्रमुख युवासेना अमित भोगले , युवासेना विभाग प्रमुख राहुल सावंत, युवासेना शाखा प्रमुख पप्पू परब, किशोर कासले, निलेश मालवणकर, आयवन फर्नांडिस, बाबू आंगणे, तनुराज आंगणे व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!