सत्ता नसूनही गांवातील आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लागत आहेत ; आ. वैभव नाईक यांच्या बद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केले समाधान.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पाट गावांतील गवळदेव येथे नवीन एसटी पिकअप शेड उभारण्यात आली आहे. बुधवारी आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पाट येथील गावभेट दौऱ्यादरम्यान या एसटी पिकअप शेडचे लोकार्पण करण्यात आले. पाट गांवाच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे देखील सर्वोतपरी सहकार्य केले जाईल असे आ. वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
पाट गांवात शिवसेनेची सत्ता नसताना देखील आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गावातील विकास कामे मार्गी लावली जात आहेत.एसटी पिकअप शेडमुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे. याआधीही आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत. सत्ता नसली तरी गावच्या विकासात राजकारण बाजूला ठेवले जात आहे. त्यामुळेच जनतेच्या मनातील लोकप्रिय आमदार म्हणून त्यांची ख्याती असल्याचे उपविभाग प्रमुख महेश वेळकर, माजी सरपंच रीती राऊळ, ग्रा. पं. सदस्या दिया आवळे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, अतुल बंगे,तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभू, उपविभाग प्रमुख महेश वेळकर, माजी सरपंच रीती राऊळ, ग्रा. पं. सदस्या दिया आवळे, शाखा प्रमुख सुधीर हळदणकर, शाखा प्रमुख कृष्णकांत परब,ग्रा. पं. सदस्य जितेंद्र गोसावी, ग्रा. पं. सदस्या वैष्णवी शेगले,उपशाखा प्रमुख प्रशांत पाटकर, तंटामुक्ती अध्यक्ष बबन पाटकर ,.सहदेव प्रभू, राजू आवळे, सौ. मयेकर, सुधीर माधव, स्वप्नील परब,अमोल परब, बाबा बोंबडे, स्वप्नील बागवे, जयवंत परब, मकरंद परब, विठोबा शेगले, राजू शिरपुटे, स्वप्नील पाटकर, लवू परब यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.