नवी दिल्ली | ब्युरो न्यूज : गेल्या ९ वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध सन्मानाने गौरवीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रीसच्या राष्ट्राध्यक्ष कॅटरिना एन. सकेलारोपोलू यांनी ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर’ या देशातील दुसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित केले. ४० वर्षानंतर ग्रीसला जाणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. ग्रीसमध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षा सकेलारोपोलू यांची भेट झाली. यावेळी ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताच्या चांद्रयानाच्या यशस्वीतेबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीस देशाचे आभार मानले व यापुढे सर्व क्षेत्रात भारत व ग्रीस एकत्र कार्यरत राहयचा प्रयत्न करत राहतील अशी आशा व्यक्त केली. ग्रीसची राजधानी अथेन्स इथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.