मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कुडाळ एस टी आगारासाठी एसटी गाड्यांची कमतरता असल्याची तक्रार आमदार वैभव नाईक यांच्याकडे एसटी वाहक व कर्मचाऱ्यांनी केली होती. त्यानुसार आमदार वैभव नाईक यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक शेखर चन्ने व सिंधुदुर्ग एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांच्या समवेत चर्चा करून कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन एसटी गाड्या देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत कुडाळ आगारासाठी ६ स्लीपर व ४ साध्या अशा एकूण १० नवीन एसटी गाड्या आणि मालवण आगारासाठी ४ नवीन एसटी गाड्या देण्याचे शेखर चन्ने यांनी मान्य केले होते.
यातील १ स्लीपर गाडी आज कुडाळ आगारात दाखल होणार आहे. अन्य गाड्याही लवकरच दाखल होणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.