23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

जिल्ह्यातील परप्रांतीय सलून कामगारांविरुद्ध नाभिक समाज संघटना आक्रमक होणार ; जिल्हाध्यक्ष जगदीश चव्हाण यांचा इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परराज्यीय कामगारांच्या प्रश्नामध्ये आता नाभिक संघटनेने कडक इशारा दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलून व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगार वाढत आहेत. यामुळे स्थानिक व समाज बांधव यांच्या उदरनिर्वाहावर याचा परिणाम होत आहे. हे थांबवण्यासाठी जिल्हा नाभिक संघटने मार्फत परप्रांतीय कामगार खासकरून भैया हटाव भूमिका घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘भैया हटाव’ मोहीम राबवली जाईल असे स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी मालवण येथील भैरवी मंदिर येथे आयोजित बैठकीत हा इशारा दिला आहे.

नाभिक समाज संघटनेची बैठक मालवण शहर येथील भैरवी मंदिर येथे घेण्यात आली. या बैठकीत सलून व्यवसायात होणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या शिरकावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. परप्रांतीय सलून कारागीर पूर्ण जिल्हाभर सलून दुकानांमध्ये आहेत. त्यामुळे पारंपारिक कौशल्याला आळा बसला आहे. समाज बांधव या विषयामुळे त्रस्त बनले आहेत. यासोबत जिल्ह्यात गुन्हेगारी घटनेत भैया सहभागाच्या तक्रारी आहेत. या सर्वांचा विचार करता सलून व्यवसाय यातील परप्रांतीय व भैया यांना एक महिन्याची मुदत देऊन परत माघारी पाठवणे बाबत समज देण्याबाबत भूमिका घेतली जाणार आहे. तरीही हे कामगार न गेल्यास भैय्या हटाव मोहीम घेतली जाईल. त्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करणार असल्याचेही जगदीश चव्हाण यांनी शुक्रवारी माहिती देताना सांगितले.

यावेळी राज्याचे राज्य संघटक विजय चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा सचिव जगदीश चव्हाण, युवा जिल्हा कार्याध्यक्ष शुभम लाड, मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपाली शिंदे, युवा मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, ज्येष्ठ सल्लागार बा. स. लाड, मालवण शहर अध्यक्ष अंकुश चव्हाण आणि नाभिक समाजातील इतर सलून व्यावसायिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परराज्यीय कामगारांच्या प्रश्नामध्ये आता नाभिक संघटनेने कडक इशारा दिला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सलून व्यवसायामध्ये परप्रांतीय कामगार वाढत आहेत. यामुळे स्थानिक व समाज बांधव यांच्या उदरनिर्वाहावर याचा परिणाम होत आहे. हे थांबवण्यासाठी जिल्हा नाभिक संघटने मार्फत परप्रांतीय कामगार खासकरून भैया हटाव भूमिका घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'भैया हटाव' मोहीम राबवली जाईल असे स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेचे अध्यक्ष जगदीश चव्हाण यांनी मालवण येथील भैरवी मंदिर येथे आयोजित बैठकीत हा इशारा दिला आहे.

नाभिक समाज संघटनेची बैठक मालवण शहर येथील भैरवी मंदिर येथे घेण्यात आली. या बैठकीत सलून व्यवसायात होणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या शिरकावाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. परप्रांतीय सलून कारागीर पूर्ण जिल्हाभर सलून दुकानांमध्ये आहेत. त्यामुळे पारंपारिक कौशल्याला आळा बसला आहे. समाज बांधव या विषयामुळे त्रस्त बनले आहेत. यासोबत जिल्ह्यात गुन्हेगारी घटनेत भैया सहभागाच्या तक्रारी आहेत. या सर्वांचा विचार करता सलून व्यवसाय यातील परप्रांतीय व भैया यांना एक महिन्याची मुदत देऊन परत माघारी पाठवणे बाबत समज देण्याबाबत भूमिका घेतली जाणार आहे. तरीही हे कामगार न गेल्यास भैय्या हटाव मोहीम घेतली जाईल. त्या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करणार असल्याचेही जगदीश चव्हाण यांनी शुक्रवारी माहिती देताना सांगितले.

यावेळी राज्याचे राज्य संघटक विजय चव्हाण, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश पिंगुळकर, जिल्हा सचिव जगदीश चव्हाण, युवा जिल्हा कार्याध्यक्ष शुभम लाड, मालवण तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. दिपाली शिंदे, युवा मालवण तालुकाध्यक्ष संदीप लाड, माजी तालुकाध्यक्ष विजय शिवा चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, ज्येष्ठ सल्लागार बा. स. लाड, मालवण शहर अध्यक्ष अंकुश चव्हाण आणि नाभिक समाजातील इतर सलून व्यावसायिक उपस्थित होते.

error: Content is protected !!