23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आडवलीच्या प्राथमिक शाळेला शैक्षणिक वाली कोण ?

- Advertisement -
- Advertisement -

आडवली ग्रामस्थांकडुन शाळाबंद आंदोलन ; बेफिकीरीचा आरोप करत शिक्षण विभागावर नाराजी.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आडवली येथील प्राथमीक शाळा क्र. १ विद्यालयात ३ महिने उलटुनही तात्पुरत्या कामगिरीवर गेलेला शिक्षक अद्यापही परत दिलाच नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा सवाल करत आणि जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी श्री माने हे नुसती बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करुन संतत्प ग्रामस्थांकडुन शाळाबंद आंदोलन करण्यात आले आहे . आज २४ ऑगस्टला शाळेतून १२ वाजता घरी नेण्यात आले.

आडवली शाळेत एकूण ४ शिक्षकांपैकी आज ३ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी एक रजेवर म्हणजे शाळेत दोणच शिक्षक. मुख्याद्यापकांना मोबाईलवर आलेल्या फक्त पत्रावर, मुख्याद्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता, या शाळेच्या शिक्षकांना कामगिरीवर जाण्यास कार्यमुक्त केले. प्रत्यक्ष ७ वर्ग व दोन शिक्षक यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची विचारणा केली असता तालुका किंवा जिल्हा पातळीवरुन उत्तरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मोबाईल मॅसेज वरुन जबाबदारीचे शैक्षणिक कामकाज, अशा शिक्षण विभागाकडून चालते. आडवली शाळेचे कायमस्वरूपी शिक्षक कामगिरी म्हणुन दुसऱ्या शाळेत पाठविले, याबाबत सर्व पालकांनी आंदोलन करून आज पासून शिक्षक मिळेपर्यंत शाळाबंद आंदोलन सुरु केले आहे. यावेळी केंद्र प्रमुख देऊ जंगले यांनी, “आंदोलन करु नका यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे,” असे सांगितले परंतु शाळेत पुरेपूर शिक्षक नसल्याने नुकसान हे होतच आहे. त्यापेक्षा मुले घरी अभ्यास करतील अशी नाराजीची आक्रमक भूमिका गेत पालकांनी शिक्षण विभागाला जागे करण्यासाठी मुलांना घरी नेले. शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने आडवली शाळेला एकंदरीत कोणीच वाली नसल्याने, पालकांनी शाळा बंद आंदोलन चालू केले आहे.

शिक्षण विभागाने पालक मंत्री व शिक्षण मंत्री यांचेशी लवकरच चर्चा करुन यावर तोडगा काढावा व मूळ शिक्षकांना शाळेवर हजर करावे अशी मागणी आडवलीच्या संतप्त पालकांमधुन होत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निर्दोष साटम, उपाध्यक्षा शुभागी कदम, आडवली शाखाप्रमुख विष्णु उर्फ दिपक घाडीगांवकर, ग्रा.पं. सदस्य सुनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते परेश साटम, जगदिश घाडीगांवकर, लक्ष्मण
घाडीगांवकर, सचिन घाडीगावकर, सोनल घाडीगावकर. गणेश आचरेकर, कपिल कदम, समीर घाडीगांवकर, सखाराम घाडीगांवकर, संदीप घाडीगांवकर, रवींद्र घाडीगांवकर, रसीका घाडीगांवकर, आरती घाडीगांवकर, अजीत घाडीगांवकर, गौरी घाडीगांवकर, सूनील कदम, तुषार कदम, तेजस्वी घाडीगांवकर, व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आडवली ग्रामस्थांकडुन शाळाबंद आंदोलन ; बेफिकीरीचा आरोप करत शिक्षण विभागावर नाराजी.

कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आडवली येथील प्राथमीक शाळा क्र. १ विद्यालयात ३ महिने उलटुनही तात्पुरत्या कामगिरीवर गेलेला शिक्षक अद्यापही परत दिलाच नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरुन देणार असा सवाल करत आणि जिल्हा शिक्षण अधिकारी, गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकारी श्री माने हे नुसती बघ्याची भुमिका घेत असल्याचा आरोप करुन संतत्प ग्रामस्थांकडुन शाळाबंद आंदोलन करण्यात आले आहे . आज २४ ऑगस्टला शाळेतून १२ वाजता घरी नेण्यात आले.

आडवली शाळेत एकूण ४ शिक्षकांपैकी आज ३ शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी एक रजेवर म्हणजे शाळेत दोणच शिक्षक. मुख्याद्यापकांना मोबाईलवर आलेल्या फक्त पत्रावर, मुख्याद्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता, या शाळेच्या शिक्षकांना कामगिरीवर जाण्यास कार्यमुक्त केले. प्रत्यक्ष ७ वर्ग व दोन शिक्षक यामुळे मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची विचारणा केली असता तालुका किंवा जिल्हा पातळीवरुन उत्तरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मोबाईल मॅसेज वरुन जबाबदारीचे शैक्षणिक कामकाज, अशा शिक्षण विभागाकडून चालते. आडवली शाळेचे कायमस्वरूपी शिक्षक कामगिरी म्हणुन दुसऱ्या शाळेत पाठविले, याबाबत सर्व पालकांनी आंदोलन करून आज पासून शिक्षक मिळेपर्यंत शाळाबंद आंदोलन सुरु केले आहे. यावेळी केंद्र प्रमुख देऊ जंगले यांनी, "आंदोलन करु नका यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान आहे," असे सांगितले परंतु शाळेत पुरेपूर शिक्षक नसल्याने नुकसान हे होतच आहे. त्यापेक्षा मुले घरी अभ्यास करतील अशी नाराजीची आक्रमक भूमिका गेत पालकांनी शिक्षण विभागाला जागे करण्यासाठी मुलांना घरी नेले. शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने आडवली शाळेला एकंदरीत कोणीच वाली नसल्याने, पालकांनी शाळा बंद आंदोलन चालू केले आहे.

शिक्षण विभागाने पालक मंत्री व शिक्षण मंत्री यांचेशी लवकरच चर्चा करुन यावर तोडगा काढावा व मूळ शिक्षकांना शाळेवर हजर करावे अशी मागणी आडवलीच्या संतप्त पालकांमधुन होत आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निर्दोष साटम, उपाध्यक्षा शुभागी कदम, आडवली शाखाप्रमुख विष्णु उर्फ दिपक घाडीगांवकर, ग्रा.पं. सदस्य सुनिल जाधव, सामाजिक कार्यकर्ते परेश साटम, जगदिश घाडीगांवकर, लक्ष्मण
घाडीगांवकर, सचिन घाडीगावकर, सोनल घाडीगावकर. गणेश आचरेकर, कपिल कदम, समीर घाडीगांवकर, सखाराम घाडीगांवकर, संदीप घाडीगांवकर, रवींद्र घाडीगांवकर, रसीका घाडीगांवकर, आरती घाडीगांवकर, अजीत घाडीगांवकर, गौरी घाडीगांवकर, सूनील कदम, तुषार कदम, तेजस्वी घाडीगांवकर, व पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!