मुंबई | ब्युरो न्यूज : तीनच दिवसांपूर्वी पेणचे माजी नगराध्यक्ष शिशीर धारकर यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवबंधन बांधले.

मातोश्रीवरील शिवबंधनानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे यांचे स्वागत केले व आता शिवसैनिक अधिक जोमाने लढणार असल्याचे प्रतिपादन केले. शिर्डीची जागा आपलीच असून ती जिंकण्यासाठी सर्व शिवसैनिक प्रयत्न करणारच असे त्यांनी स्पष्ट केले व विरोधकांवर टीका केली.