24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

राहुल द्रविड यांची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड…!

- Advertisement -
- Advertisement -

टी ट्वेंन्टी विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यापासून घेणार सूत्रे हाती.

माजी कसोटीपटू पारस म्हांब्रेंची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

दुबई | क्रिडा वृत्त : राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. प्रशिक्षकपदासाठीच्या अनेक देशीविदेशी नावांच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुल द्रविड यांना केवळ युवा 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदात रस होता परंतु बि.सि.सि.आय.चे अध्यक्ष व द्रविड यांचे माजी संघ साथीदार सौरव गांगुली व बि.सि स.सि.आय. सचिव श्री जय शहा यांनी आय.पि.एल.च्या दुबई आयोजना दरम्यान द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी राजी केले आहे.
टी ट्वेंटी विश्वचषकानंतर होणार्या न्यूझीलंड दौऱ्यापासून ते प्रशिक्षकपद भूषवणार आहेत या वृत्ताला द्रविड यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान मुंबईचे माजी कसोटी गोलंदाज श्री.पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्री विक्रम राठोऱ हे कायम रहातील असे बि.सि सी.आयतर्फे सांगण्यात आले असून क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाबाबतचा निर्णय अजुनही गुलदस्त्यात आहे.
श्री राहुल द्रविड यांच्या निवडीनंतर आता श्री रवी शास्त्री यांची भारताचे मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षकाची इनिंग्ज संपुष्टात आली असून ते विश्वचषकानंतर पदावर रहाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्री राहुल द्रविड यांच्या नियुक्तीचे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. साल 2023 च्या अखेरपर्यंत श्री. राहुल द्रविड हे भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पहातील आणि त्यासाठी त्यांना रुपये दहा कोटी इतकी कराराची रक्कम ठरविण्यात आली आहे.

( खालील फोटो : पारस म्हांब्रे,माजी कसोटीपटू)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

  1. अभिनंदन मा. श्री. राहुल द्रविडसर व श्री. पारस सर.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

टी ट्वेंन्टी विश्वचषकानंतर न्यूझीलंड दौऱ्यापासून घेणार सूत्रे हाती.

माजी कसोटीपटू पारस म्हांब्रेंची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

दुबई | क्रिडा वृत्त : राहुल द्रविड यांची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. प्रशिक्षकपदासाठीच्या अनेक देशीविदेशी नावांच्या विविध चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुल द्रविड यांना केवळ युवा 19 वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदात रस होता परंतु बि.सि.सि.आय.चे अध्यक्ष व द्रविड यांचे माजी संघ साथीदार सौरव गांगुली व बि.सि स.सि.आय. सचिव श्री जय शहा यांनी आय.पि.एल.च्या दुबई आयोजना दरम्यान द्रविड यांना मुख्य प्रशिक्षक पदासाठी राजी केले आहे.
टी ट्वेंटी विश्वचषकानंतर होणार्या न्यूझीलंड दौऱ्यापासून ते प्रशिक्षकपद भूषवणार आहेत या वृत्ताला द्रविड यांच्याकडून दुजोरा मिळाला आहे.
दरम्यान मुंबईचे माजी कसोटी गोलंदाज श्री.पारस म्हांब्रे यांची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून श्री विक्रम राठोऱ हे कायम रहातील असे बि.सि सी.आयतर्फे सांगण्यात आले असून क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाबाबतचा निर्णय अजुनही गुलदस्त्यात आहे.
श्री राहुल द्रविड यांच्या निवडीनंतर आता श्री रवी शास्त्री यांची भारताचे मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षकाची इनिंग्ज संपुष्टात आली असून ते विश्वचषकानंतर पदावर रहाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्री राहुल द्रविड यांच्या नियुक्तीचे भारतीय क्रिकेट क्षेत्रातील सर्वच क्षेत्रातून स्वागत होत आहे. साल 2023 च्या अखेरपर्यंत श्री. राहुल द्रविड हे भारतीय मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पहातील आणि त्यासाठी त्यांना रुपये दहा कोटी इतकी कराराची रक्कम ठरविण्यात आली आहे.

( खालील फोटो : पारस म्हांब्रे,माजी कसोटीपटू)

error: Content is protected !!