मुंबई | ब्युरो न्यूज : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकेतील तुफान विनोदी तसेच चरित्र अभिनेते श्री. विजय चव्हाण यांचा आज स्मृतिदिन असून मराठीतील अनेक दिग्गज समिक्षक, लेखक व सिने पत्रकार यांनी त्यांना विविध माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
‘मोरूची मावशी’ या तुफान विनोदी नाटकाद्वारे त्यांनी मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान कोरले आहे. विजय चव्हाण हे मराठी रंगभूमीवरचे कलाकार होते. दिवंगत प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेल्या मोरूची मावशी या नाटकातील मावशीच्या स्त्री-भूमिकेसाठी ते विशेष ओळखले जातात. या नाटकाचे जवळ जवळ २००० प्रयोग झाले होते. त्यानंतर मालिका आणि चित्रपटात व्यस्त असून त्यांनी एकाच नाटकात १४ भूमिका करण्याचाही विक्रम केला होता.