कणकवली / सहिष्णू पंडित : ऐलमा पैलमा अक्षरदेवा सिंधुदुर्ग महिला साहित्य समूहाला यंदा नऊ वर्षे पूर्ण होत असून आता दशकपू्र्ती उत्सवाकडे वाटचाल सुरु झाली आहे.रविवार दि.20 रोजी कणकवलीतील बावर्ची हाॅटेलमध्ये या समूहाची सभा घेण्यात आली.या सभेत येत्या वर्षभरात जे विशेष साहित्य केंद्रित उपक्रम होणार आहेत त्याबद्दल नियोजन करण्यात आले. सोशल मीडियाचा डोळस वापर काही उपक्रमात केला जाणार असून समाज आणि साहित्य यांचा समन्वय असण्याची समुहाची आग्रही भूमिका राहील असे समूह सदस्याकडून सांगण्यात येते.याच वेळीसमूहातील ज्येष्ठ सदस्य अनुराधा दीक्षित यांच्या ‘भावसंवाद’या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ही समूह सख्यांच्या मेळाव्यात करण्यात आले.या मेळाव्यात मालवणमधील वैशाली पंडित, डॉ.सुमेधा नाईक, सानिका वायंगणकर,माणगांव येथील डॉ. मेधा फणसळकर, स्नेहल फणसळकर, न्हावेली मधील स्मिता नाईक, देवयानी आजगावकर, सावंतवाडीतून संगीता तोरस्कर,फणसगावच्या अलका नारकर,कणकवलीच्या संपदा प्रभुदेसाई, देवगडच्या अनुराधा दीक्षित आणि वेंगुर्ल्याच्या मधुरा आठलेकर या साहित्यिक उपस्थित होत्या.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -