26.4 C
Mālvan
Wednesday, November 20, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने चौथ्यांदा पटकावले आय पि एल विजेतेपद..!

- Advertisement -
- Advertisement -

केकेआरचा 27 धावांनी धुव्वा उडवत साकार केला विजय….!

मराठमोळे ॠतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर ठरले चेन्नईच्या विजेतेपदाचे शिलेदार….!

क्रिडा वृत्त | दुबई : आय.पि.एल.चा चौदावा मोसम चेन्नई सुपर किंग्जने तडफदारपणे जिंकला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील अंतिम सामन्यात कोलकात्ता नाईट रायडर्सच्या कप्तान ऑयन माॅर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले.
सहाव्या षटकांत संघाचे अर्धशतक धावफलकावर लागल्यानंतर सलामीच्या ऋतुराज गायकवाड व फॅफ डुप्लसीने धावफलक हलता ठेवला .नवव्या षटकांत धावांची गती वाढवायच्या नादात गायकवाडचा सुनिल नारायणचा बळी ठरला तेंव्हा संघाच्या 65 धावा झाल्या होत्या.
नंतर आलेल्या उत्थप्पाने त्याच्या सद्यस्थितितील फाॅर्मला साजेशी खेळी करत धावांचा जोर वाढवला. पंधरा चेंडूत 31 धावा काढून तो बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली होती परंतु शेवटी डुप्लेसीच्या 86 धावा आणि मोहन अलीच्या धावा फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने तीन बाद 192 धावा करुन के के आरला 193 धावांचे लक्ष्य दिले.
एक आव्हानात्मक लक्ष्य समोर असलेल्या के के आरने भयानक वादळी सुरवात करत दहा षटकांत बिनबाद 88 अशी आघाडी घेतली होती .परंतु सलामीचा विस्फोटक व्यंकटेश अय्यर 51 धावांवर तंबूत परतल्यानंतर के के आरच्या संघाला गळती लागली.जाडेजाच्या अप्रतिम झेलाने सामन्याचा नूर पालटला.शुभभन गिलचे अर्धशतक वगळता के के आरचे दिनेश कार्तिक, ऑयन माॅर्गन, त्रिपाठी, नितीश राणा अशी कागदावरील भक्कम मध्यफळी अक्षरशः सायकल स्टॅन्डमधील सायकलींप्रमाणे कोसळली.
शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा आणि जाॅश हेझलवुडच्या अचूक मार्यासमोर केकेआरला तब्बल 27 धावांनी हार पत्करावी लागली .
स्पर्धेतील सर्वात सरासरी वयस्कर अशा चेन्नईने ही स्पर्धा 2010 ,2011,2018 व आता चौथ्यांदा जिंकली आहे .
महेंद्रसिंग धोनीच्या चौथ्या आय पि एल विजेतेपदामुळे चेन्नई व चेन्नई समर्थकांमध्ये विजयानंतर भरपूर उधाण आले आहे.
यंदा चेन्नई सुपर किंग्जच्या सांघिक कामगिरीमध्ये महाराष्ट्राच्या ॠतुराज गायकवाडने मोलाची कामगिरी बजावत स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढून मानाची ऑरेंज कॅप पटकावली आहे.
आता दुबई येथेच टी ट्वेंटी विश्वचषक देखिल सुरु होत असल्याने भारताचा संपूर्ण संघ तिथेच आपले सराव सामने दिनांक 18 पासून खेळायला सुरु करणार आहे .
या विश्वचषकाच्या संघासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनी विनामूल्य त्याची सेवा आणि वेळ भारतीय क्रिकेटला देणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

केकेआरचा 27 धावांनी धुव्वा उडवत साकार केला विजय....!

मराठमोळे ॠतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर ठरले चेन्नईच्या विजेतेपदाचे शिलेदार....!

क्रिडा वृत्त | दुबई : आय.पि.एल.चा चौदावा मोसम चेन्नई सुपर किंग्जने तडफदारपणे जिंकला आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील अंतिम सामन्यात कोलकात्ता नाईट रायडर्सच्या कप्तान ऑयन माॅर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले.
सहाव्या षटकांत संघाचे अर्धशतक धावफलकावर लागल्यानंतर सलामीच्या ऋतुराज गायकवाड व फॅफ डुप्लसीने धावफलक हलता ठेवला .नवव्या षटकांत धावांची गती वाढवायच्या नादात गायकवाडचा सुनिल नारायणचा बळी ठरला तेंव्हा संघाच्या 65 धावा झाल्या होत्या.
नंतर आलेल्या उत्थप्पाने त्याच्या सद्यस्थितितील फाॅर्मला साजेशी खेळी करत धावांचा जोर वाढवला. पंधरा चेंडूत 31 धावा काढून तो बाद झाल्यानंतर चेन्नईची धावगती मंदावली होती परंतु शेवटी डुप्लेसीच्या 86 धावा आणि मोहन अलीच्या धावा फलंदाजीच्या जोरावर चेन्नईने तीन बाद 192 धावा करुन के के आरला 193 धावांचे लक्ष्य दिले.
एक आव्हानात्मक लक्ष्य समोर असलेल्या के के आरने भयानक वादळी सुरवात करत दहा षटकांत बिनबाद 88 अशी आघाडी घेतली होती .परंतु सलामीचा विस्फोटक व्यंकटेश अय्यर 51 धावांवर तंबूत परतल्यानंतर के के आरच्या संघाला गळती लागली.जाडेजाच्या अप्रतिम झेलाने सामन्याचा नूर पालटला.शुभभन गिलचे अर्धशतक वगळता के के आरचे दिनेश कार्तिक, ऑयन माॅर्गन, त्रिपाठी, नितीश राणा अशी कागदावरील भक्कम मध्यफळी अक्षरशः सायकल स्टॅन्डमधील सायकलींप्रमाणे कोसळली.
शार्दुल ठाकुर, रविंद्र जाडेजा आणि जाॅश हेझलवुडच्या अचूक मार्यासमोर केकेआरला तब्बल 27 धावांनी हार पत्करावी लागली .
स्पर्धेतील सर्वात सरासरी वयस्कर अशा चेन्नईने ही स्पर्धा 2010 ,2011,2018 व आता चौथ्यांदा जिंकली आहे .
महेंद्रसिंग धोनीच्या चौथ्या आय पि एल विजेतेपदामुळे चेन्नई व चेन्नई समर्थकांमध्ये विजयानंतर भरपूर उधाण आले आहे.
यंदा चेन्नई सुपर किंग्जच्या सांघिक कामगिरीमध्ये महाराष्ट्राच्या ॠतुराज गायकवाडने मोलाची कामगिरी बजावत स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढून मानाची ऑरेंज कॅप पटकावली आहे.
आता दुबई येथेच टी ट्वेंटी विश्वचषक देखिल सुरु होत असल्याने भारताचा संपूर्ण संघ तिथेच आपले सराव सामने दिनांक 18 पासून खेळायला सुरु करणार आहे .
या विश्वचषकाच्या संघासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महेंद्रसिंग धोनी विनामूल्य त्याची सेवा आणि वेळ भारतीय क्रिकेटला देणार आहे.

error: Content is protected !!