बांदा /प्रतिनिधी : बांदा शहराला क्रीडा परंपरेचा वारसा लाभलेला आहे.या दशक्रोशीतील विद्यार्थी बांदा शहरात शिक्षण घेत आहेत. यामुळे बांदा शहरांमध्ये शासकीय क्रीडांगण होणं खूप गरजेचं आहे. असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांनी व्यक्त केले. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हणाले की भाजपशी आमचे काही मतभेद असले तरी बांदा शहरासाठी म्हणून माजी सभापती शितल राहुल यांच्यासोबत आम्ही उभे राहणार आहोत. गेली कित्येक वर्ष हा क्रीडांगणाचा प्रश्न मागे राहिलेला आहे. त्यांना फक्त सावंतवाडी शहर म्हणजेच आपल्या आमदारकीचा मतदार संघ आहे असं वाटत आहे. कारण बांदा शहर आणि आजूबाजूची गाव यांनी मिळून निवडणुकीच्या काळामध्ये आमदार दीपक भाई केसरकर यांना आम्ही सहकार्य केले होते. परंतु त्यांना त्या निवडणुकीच्या मताधिक्याचा विसर पडलेला असावा असेही म्हटले आहे. बांदा शहरातील जमीन प्रशासनाच्या हातात असूनही बांदा शहरात होऊ घातलेले क्रीडा संकुल उचलून ते सावंतवाडीत येथे नेऊन ठेवण्याचं ते प्रयत्न करत आहे. बांदा वासीयाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्न आज त्यांनी डावललेला आहे. आमदार दिपक केसरकर सावंतवाडी शहरातीलच ते आमदार आहेत की काय? असा प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज यांनी केला आहे. असे असेल तर ही बांदा वासीय यापुढे पुढच्या निवडणुकीमध्ये केसरकर यांना नक्कीच आपल्या मतदानाद्वारे याचे उत्तर देतील असे मत रियाज खान यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -