कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आडवली येथील आर. ए. यादव हायस्कूल येथे, राज्यगीत, ध्वजगीत व केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पंचप्राण शपथ घेत, भारताचा ७६ वा स्वातंत्र्य दिन व रानभाज्यांचे प्रदर्शनचे संपन्न झाले. शाळा समिती, अध्यक्ष कमलाकांत कुबल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रधानमंत्री पोषण शक्ती आहार योजनेअंतर्गत रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अरुण लाड यांनी फित कापून रानभाजी प्रदर्शनाचे उदघाटन केले. हायस्कूल मधील इ.८ वी ते १० वीतील विद्यार्थांनी राष्ट्रभक्तीपर समूहगीत गीत गायन केले. कु. अथर्व तुळपुळे याच्या स्वातंत्र्याची गाथा भाषणाला, अध्यक्ष कमलाकांत कुबल व अरुण लाड यांनी रोख बक्षीस देऊन अथर्वची प्रशंसा केली.
या कार्यक्रमासाठी संस्था सदस्य अरुण लाड, शालेय समिती सदस्य चंद्रदीपक मालंडकर, प्रमोद सावंत, अरविंद साटम, सौ. सीमा घाडीगांवकर, सरपंच संदिप आडवलकर, प्रसाद साटम, तसेच ग्रामपंचायत सदस्य, शिक्षणप्रेमी, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापक श्री. सकपाळ यांनी सर्वांचे आभार मानले.