28.8 C
Mālvan
Sunday, April 27, 2025
IMG-20240531-WA0007

डेगवे मोबाईल टाॅवर बाबतीत लेखी आश्वासनानंतर उपषोण मागे ; कार्यवाही न झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे गावात भारत संचार निगम,सावंतवाडी यांनी मोबाईल टाॅवरचा उभारला होता. त्या टाॅवरची बॅटरीची कोणी अज्ञातांनी चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

याबाबतीत गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती म्हणून आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई हे बसले होते.

यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक मा आर. व्ही.जेन्ही यांनी व इतर अधिकारी यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.व होणाऱ्या विलंबाचे कारण सांगितले व या बाबतीत व्यक्तीगत लक्ष देऊन येत्या १५ सप्टेंबर २०२३ पूर्वी सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे हे उपोषण मागे घेतले असून जर दिलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा त्याच ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपतालुका प्रमुख तथा माजी सरपंच मंगलदास देसाई, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुनील देसाई, गजानन नाटेकर व अन्य पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या डेगवे गावात भारत संचार निगम,सावंतवाडी यांनी मोबाईल टाॅवरचा उभारला होता. त्या टाॅवरची बॅटरीची कोणी अज्ञातांनी चोरी केल्याने डेगवेतील ग्रामस्थांना मोबाईल रेंज अभावी गेले वर्षभर नाहक त्रास सहन करावा लागला आहे.

याबाबतीत गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सदस्य तथा शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री विजय देसाई यांनी संबंधित कार्यालयातील अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटी व लेखी निवेदने दिली होती. त्यामुळे ठराविक उत्तरापलीकडे काही हालचाल नव्हती म्हणून आज भारताच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधित कार्यालयाच्या सावंतवाडी येथील आवारात बेमुदत उपोषणास विजय देसाई हे बसले होते.

यावेळी भारत संचार निगम सावंतवाडीचे उपमहाप्रबंधक मा आर. व्ही.जेन्ही यांनी व इतर अधिकारी यांनी उपोषण कर्त्याची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.व होणाऱ्या विलंबाचे कारण सांगितले व या बाबतीत व्यक्तीगत लक्ष देऊन येत्या १५ सप्टेंबर २०२३ पूर्वी सदर प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे हे उपोषण मागे घेतले असून जर दिलेल्या कालावधीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले तर पुन्हा त्याच ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपतालुका प्रमुख तथा माजी सरपंच मंगलदास देसाई, सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन सुनील देसाई, गजानन नाटेकर व अन्य पदाधिकारी,अधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!