संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या ‘माध्यमिक विद्यामंदिर, साळशी’ येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कै सिध्दी मराठे स्मृति पारितोषिक व मोफत वह्या, शालेय दप्तर तथा स्कूल बॅग वितरण उपक्रम राबविण्यात आला. या प्रशालेतील ध्वजारोहणाचा मान सेवानिवृत्त पोलीस हवालदार विलास गांवकर यांना देण्यात आला. प्रशालेतील सहाय्यक शिक्षक संजय मराठे व कुटुंबीयांकडून दरवर्षी देण्यात येणारे कै. सिद्धी मराठे स्मृती पारितोषिक या प्रशालेतील इयत्ता आठवी ते दहावी मधील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या मंदार संतोष साळसकर (आठवी), नम्रता संतोष पवार (नववी), मनोज महेश भोगले (दहावी) या विद्यार्थ्यांना, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. ग्रामस्थ अंबरनाथ केशव गांवकर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या वह्या आणि वज्रदास चारिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने देण्यात आलेल्या स्कूल बॅग या दोन्ही शालेय साहित्यांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच वैशाली सुतार, उपसरपंच कैलास गांवकर, ग्रामपंचायत सदस्य विशाखा साळसकर, सेवानिवृत्त पोलीस हवालदार विलास गांवकर, प्रभाकर साळसकर, विजय सुतार, अंबरनाथ गांवकर, संतोष आत्माराम साळसकर , संतोष दत्ताराम साळसकर, चाफेड गावचे माजी सरपंच आकाश राणे, संतोष मारुती साळसकर, बाबू साळसकर, राजेंद्र साटम, विजय ओटवकर, प्रवीण राणे, अंगणवाडी सेविका प्रतिक्षा शिवलकर, मदतनीस संध्या नाईक, प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहशिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षक पुरुषोत्तम साटम यानी मानले.