उद्योजक सुनील पालव यांनी दिला ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ तसेच मुलांना बालसंस्कार अत्यावश्यक असा संदेश.
संतोष साळसकर | सहसंपादक : ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ हा संदेश देणार्या जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र, जोगेश्वरी आणि ग्रामपंचायत कुवळे – रेंबवली यांच्या संयुक्त विद्यमानाने थोर समाजसुधारक, तत्वज्ञ सदगुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त, ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत कुवळे येथे मोफत वृक्ष वाटप कार्यक्रम रविवारी संपन्न झाला.
जीवनविद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र जोगेश्वरी यांच्यावतीने देवगड तालुक्यातील कुवळे गावात सन २०१८ पासून ग्रामसमृद्धी अभियान उपक्रम राबविण्यात येत आहे यानिमित्त या गावात आरोग्य शिबिर, बचत गटाना मार्गदर्शन, बालसंस्कार, युवा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन यासारखे विविध उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्यातून राबवण्यात येत आहेत . रविवारी सद्गुरु श्री वामनराव पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त व ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत कुवळे येथे १०० वृक्षांचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक सुनील पालव यांनी, मुलांना बाल संस्कार देणे गरजेचे असून तरुणांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे ते देशाचे आधारस्तंभ आहेत असे मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी सरपंच सुभाष कदम , उपसरपंच प्रदोष प्रभुदेसाई, उद्योजक सुनील पालव, मंदाकीनी पालव, महिला बचत गटाच्या प्रमुख अमृता लाड, जीवन विद्या मिशन ज्ञानसाधना केंद्र जोगेश्वरी चे नामधारक चंद्रकांत घाडी, प्रकाश पांचाळ , मोहन कदम, अमोल पांचाळ, नेहा मोहिते, शिवानी मोहिते, प्रतिमा पांचाळ, प्रियांका नारकर, सुनंदा जाधव, प्रकाश घाडी, रूपाली शिंदे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार सरपंच सुभाष कदम यांनी मानले. सूत्रसंचालन रुपाली शिंदे यांनी केले.