कणकवली | गणेश चव्हाण : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग यांच्या मार्फत नाभिक जन्माबाबत काही, समाज बांधवांच्या मनातील काही गैरसमज व अशिक्षितता दुर करण्याच्या हेतुने, नाभिक समाजातील दशावतार कलाकारांनी, नाभिकाचा जन्म हा ‘सेना भक्त’ या दशावतारी नाट्य प्रयोगातुन कणकवली येथे आज मोफत दाखवणार आहेत. याचा सर्व समाजांनी लाभ घ्यावा असे आवाहन कणकवली नाभिक संघटनेचे अध्यक्ष रोशन चव्हाण यांनी केले आहे.
नाभिक पुराण हे श्री विश्वनाथ भारती यांनी रचलेले आहे. नाभिक म्हणजे ‘भिक न मागणारा.’ सतत कार्य करत राहणारा. वेदांची निर्मिती झाल्यावर ब्रह्मदेवास सृष्टीची निर्मिती करण्यास सांगितले. मनुष्यामध्ये चार वर्णांची निर्मिती झाली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र. लोक कल्याणासाठी शास्त्र, मंत्र, जप, अनुष्ठान व योग सांगितले आहेत. ते केल्याने सर्वांच्या कामना सफल होतात. ते सफल होण्यासाठी या चारी वर्णातील लोकांचे कल्याण व पवित्र होण्यासाठी श्री शेष याला नाभिक अवतार धारण करण्यास विनंती केली. हे पवित्र कार्य करण्यासाठी भगवान शेष यांनी नाभिक अवतार धारण केला. असे या नाभिक जन्माविषयी पुराणात सांगितले आहे. हे या पुरिणातील कथेद्वारे मनोरंजक पध्दतीने नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या मोफत कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे कणकवली नाभिक संघटनेचे अध्यक्ष रोशन चव्हाण यांनी जाहीर केले आहे.