24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जानवली येथील अपघातात वागदे येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू ; रात्री उशिरा झाला मोटरसायकलचा गंभीर अपघात.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जवळच्या जानवली येथे काल रात्री उशिरा १०:३० वाजता एक गंभीर अपघात होऊन वागदे येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की मोटारसायकल स्वार जागीच मृत झाला. कणकवली तालुक्यातील वागदे येथील गणेश उदय काणेकर ( वागदे सावरवाडी, गोपुरी ) असे त्या मृत मोटार सायकलस्वाराचे नांव आहे.

अपघाताची घटना घडल्यावर माहिती मिळताच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असे सूत्रांकडून समजते. मृत गणेश याच्या डोक्याच्या मागील भागात जखमा होऊन रक्तस्राव होत त्याच्या कानाला जखमा झाल्या होत्या. हातापायालाही किरकोळ जखमा झाल्या होत्या. अपघाताची खबर लागताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, श्री देसाई यांनी घटनास्थळाकडे आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृत गणेशच्या पश्चात आई वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली जवळच्या जानवली येथे काल रात्री उशिरा १०:३० वाजता एक गंभीर अपघात होऊन वागदे येथील युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की मोटारसायकल स्वार जागीच मृत झाला. कणकवली तालुक्यातील वागदे येथील गणेश उदय काणेकर ( वागदे सावरवाडी, गोपुरी ) असे त्या मृत मोटार सायकलस्वाराचे नांव आहे.

अपघाताची घटना घडल्यावर माहिती मिळताच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र अपघातात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असे सूत्रांकडून समजते. मृत गणेश याच्या डोक्याच्या मागील भागात जखमा होऊन रक्तस्राव होत त्याच्या कानाला जखमा झाल्या होत्या. हातापायालाही किरकोळ जखमा झाल्या होत्या. अपघाताची खबर लागताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण, श्री देसाई यांनी घटनास्थळाकडे आणि उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृत गणेशच्या पश्चात आई वडिल व दोन बहिणी असा परिवार आहे.

error: Content is protected !!