सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांच्या देय (ड्यू) असलेल्या रकमा अनेकदा विनंती करुनही मिळत नाही आहेत म्हणून १५ ऑगस्टला थेट शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती श्री. गुंडू चव्हाण व श्री. चंद्रकांत आकेरकर यांनी दिली.
या उपोषणाला जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक पाठिंबा देत उपस्थित रहाणार असून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, शाखा सिंधुदुर्गने देखिल या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. सकाळी १०:३० ते संध्याकाळी ५ असे हे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.