मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ह्यूमन राईटस असोसीएशन फाॅर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष मंदार काणे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करण्यात आले. ११ ऑगस्टला पुणे येथील ह्यूमन राईटस असोसीएशन फाॅर प्रोटेक्शनच्या मुख्य कार्यालयात हे ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनःशाम सांडिम, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, देवगड तालुका महिला संघटक सौ. आदिती तानावडे, ओंकार बोडस उपस्थित होते.