24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गोळवण येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाचा झाला शुभारंभ.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत कार्यालय गोळवण – कुमामे- डिकवल येथे आझादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे विधिवत पूजन करून अनावरण करण्यात आले. गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हातात दिवे घेऊन पंच प्रण शपथ घेण्यात आली.

ग्रामसभेत माजी सैनिक श्री. अनिलकुमार गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, पंचायत समिती मालवणचे कृषि अधिकारी श्री. संजय गोसावी , आदर्श गांव संस्था समिती अध्यक्ष श्री. मंगेश सावंत, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. मेघा गावडे, सौ. विभा परब, सौ प्राजक्ता चिरमुले, सौ. शिल्पा तेली, श्रीम. एकादशी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील श्री. राजेंद्र चव्हाण, शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामसंघ पदाधिकारी, बचत गट सीआरपी, तसेच गाव गोळवण, कुमामे, डिकवल येथील सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सेवक यांनी क्षयरोग या आजाराबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित डिकवल गाव येथील युवती कु. यामिनी वरक हीचा युवा दिन निमित्त सत्कार करण्यात आला. आदर्श गांव योजनेमधून करण्यात येणाऱ्या कामांबाबत श्री. मंगेश सावंत यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच गांवातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या ग्रामपंचायत कार्यालय गोळवण - कुमामे- डिकवल येथे आझादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमांतर्गत 'मेरी मिट्टी मेरा देश' अभियान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे विधिवत पूजन करून अनावरण करण्यात आले. गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने हातात दिवे घेऊन पंच प्रण शपथ घेण्यात आली.

ग्रामसभेत माजी सैनिक श्री. अनिलकुमार गावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच श्री. सुभाष लाड, उपसरपंच श्री. साबाजी गावडे, पंचायत समिती मालवणचे कृषि अधिकारी श्री. संजय गोसावी , आदर्श गांव संस्था समिती अध्यक्ष श्री. मंगेश सावंत, ग्रा. पं. सदस्य श्री. शरद मांजरेकर, श्री. विरेश पवार, सौ. मेघा गावडे, सौ. विभा परब, सौ प्राजक्ता चिरमुले, सौ. शिल्पा तेली, श्रीम. एकादशी गावडे, ग्रामसेविका श्रीम. अर्पिता शेलटकर, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील श्री. राजेंद्र चव्हाण, शाळा मुख्याध्यापक व शिक्षक, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, ग्रामसंघ पदाधिकारी, बचत गट सीआरपी, तसेच गाव गोळवण, कुमामे, डिकवल येथील सुमारे १५० ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सेवक यांनी क्षयरोग या आजाराबाबत माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित डिकवल गाव येथील युवती कु. यामिनी वरक हीचा युवा दिन निमित्त सत्कार करण्यात आला. आदर्श गांव योजनेमधून करण्यात येणाऱ्या कामांबाबत श्री. मंगेश सावंत यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच गांवातील विविध विकास कामांबाबत चर्चा करण्यात आली.

error: Content is protected !!