23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे पर्यटनाच्या विकासासाठी राजकीय भेदाभेद टाळण्याचे आवाहन ; आंबोली वर्षा पर्यटन महोत्सव २०२३ चे झाले उद्घाटन.

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत पर्यटन वाढीसाठी आयोजीत केलेल्या ‘आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे’ उद्घाटन झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. १२ ते १६ ऑगस्ट पर्यंत हा उत्सव चालणार आहे. या वर्षा पर्यटन महोत्सवाला हजारो पर्यटक अपेक्षित आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आंबोली बाजारवाडी ते मुख्य धबधब्यापर्यत पर्यटकांना जाण्या- येण्यासाठी तसेच जंगल सफारीसाठी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याच्या सूचना यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ह्या पर्यटन महोत्सवाची ख्याती जगभरात पसरविली जाईल अशी घोषणाही त्यांनी या पर्यटन महोत्सवात केली. एकत्रीत पर्यटन विकास साधायचा असेल तर राजकीय भेदाभेद टाळण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते पुढे म्हणाले सर्वत्र हॉटेल बांधून पर्यटन विकास होत नसतो. आंबोलीला जैवविविधतची नैसर्गिकतेची देणगी आहे . आंबोलीत ४ महिने पाऊस पडतो तर चेरापुंजीत नऊ महिने पाऊस पडतो. देशात एअर फ्लो म्हणजे पावसाचे पाणी परत येणे अशी मोजकीच ठिकाणे आहेत. त्यामुळे कावळेसाद पाॅईंट येथे हँग ग्लायडींग होणे शक्य आहे. हा प्रकल्प येथे होणे असल्याचे ते म्हणाले. तसेच ऍडव्हेन्चर स्पोर्स्टसाठी कावळेसाद पॉंईट महत्वाचा आहे. तसेच या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी आंबोली ,चौकुळ , गेळे, पारपोली ही गावे एकत्रित होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील पंचक्रोशीचा विकास होऊ शकेल. इथे एक ठोस ‘होस्ट प्लॅन’ आवश्यक असल्याचेही आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

आंबोली हा पर्यटनाचा ब्रॅन्ड तयार व्हावा म्हणून आता दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यंदा ९ राज्यांतील ५० टूर ऑपरेटर्स या महोत्सवाला अपेक्षित आहेत असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या महोत्सवा दरम्यान आंबोली घाटातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या वर्षा पर्यटन महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत पर्यटन वाढीसाठी आयोजीत केलेल्या 'आंबोली वर्षा पर्यटन महोत्सवाचे' उद्घाटन झाले आहे. शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी या महोत्सवाचे उद्घाटन केले. १२ ते १६ ऑगस्ट पर्यंत हा उत्सव चालणार आहे. या वर्षा पर्यटन महोत्सवाला हजारो पर्यटक अपेक्षित आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आंबोली बाजारवाडी ते मुख्य धबधब्यापर्यत पर्यटकांना जाण्या- येण्यासाठी तसेच जंगल सफारीसाठी इलेक्ट्रीक बस खरेदी करण्याच्या सूचना यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच ह्या पर्यटन महोत्सवाची ख्याती जगभरात पसरविली जाईल अशी घोषणाही त्यांनी या पर्यटन महोत्सवात केली. एकत्रीत पर्यटन विकास साधायचा असेल तर राजकीय भेदाभेद टाळण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते पुढे म्हणाले सर्वत्र हॉटेल बांधून पर्यटन विकास होत नसतो. आंबोलीला जैवविविधतची नैसर्गिकतेची देणगी आहे . आंबोलीत ४ महिने पाऊस पडतो तर चेरापुंजीत नऊ महिने पाऊस पडतो. देशात एअर फ्लो म्हणजे पावसाचे पाणी परत येणे अशी मोजकीच ठिकाणे आहेत. त्यामुळे कावळेसाद पाॅईंट येथे हँग ग्लायडींग होणे शक्य आहे. हा प्रकल्प येथे होणे असल्याचे ते म्हणाले. तसेच ऍडव्हेन्चर स्पोर्स्टसाठी कावळेसाद पॉंईट महत्वाचा आहे. तसेच या ठिकाणच्या पर्यटन वाढीसाठी आंबोली ,चौकुळ , गेळे, पारपोली ही गावे एकत्रित होणे गरजेचे आहे. त्यामुळे येथील पंचक्रोशीचा विकास होऊ शकेल. इथे एक ठोस 'होस्ट प्लॅन' आवश्यक असल्याचेही आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

आंबोली हा पर्यटनाचा ब्रॅन्ड तयार व्हावा म्हणून आता दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. यंदा ९ राज्यांतील ५० टूर ऑपरेटर्स या महोत्सवाला अपेक्षित आहेत असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. या महोत्सवा दरम्यान आंबोली घाटातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या वर्षा पर्यटन महोत्सवाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहायचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!