23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आपापल्या क्षेत्रात पारदर्शक कामगिरी करणे हीच शहीद हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांना खरी श्रद्धांजली : भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य नवलराज काळे.

- Advertisement -
- Advertisement -

सरपंच,उपसरपंच,सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केले वंदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे’ यांना सीमेवरती लढताना वीरमरण येऊन काल ७ ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीला वंदन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलत असताना भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांचे बलिदान आपण व्यर्थ जाऊ देऊ नये. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते क्षेत्र राजकीय, सामाजिक, व्यावसायिक कुठलाही असो, त्या क्षेत्रातील कामात आपली पारदर्शकता असावी व सत्य मार्गाने योग्य काम आपण केली पाहिजेत. जे सीमेवरती लढताहेत ते आपल्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता दुष्मनांशी लढा देत आहेत. त्यांच्यामुळेच आपण देशामध्ये सुखी आहोत निवांत आहोत. त्यामुळे आपण पारदर्शकतेपणाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचे कार्य केले तर ती खरी शहीद मेजर कौस्तुभ दादा यांना श्रद्धांजली असेल. त्यामुळे सर्वांनी योग्य मार्गाने काम करावे व आपल्या जबाबदाऱ्या समजून गांवातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन काळे यांनी केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक विनोद कर्पे यांनी ही आपल्या भाषणात जे सीमेवर ती लढत आहेत त्यांच्या कुटुंबाची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

यावेळी गांवचे सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच अनंत जंगम, मेजर कौस्तुभ रावराणे यांचे कुटुंब सदस्य अनिल रावराणे, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, ग्रामसेवक प्रशांत जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री कर्पे, श्री कांबळे, श्री कुवर, श्री भैरळे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री महेंद्रकर, आरोग्य सेवक बोडेकर, आरोग्य सेविका चाफे, सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सरपंच,उपसरपंच,सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केले वंदन.

वैभववाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र 'हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे' यांना सीमेवरती लढताना वीरमरण येऊन काल ७ ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त गृप ग्रामपंचायत सडुरे शिराळेच्या वतीने सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रतिमा पूजन करून त्यांच्या स्मृतीला वंदन करुन श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बोलत असताना भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी मेजर कौस्तुभ रावराणे यांचे बलिदान आपण व्यर्थ जाऊ देऊ नये. आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो मग ते क्षेत्र राजकीय, सामाजिक, व्यावसायिक कुठलाही असो, त्या क्षेत्रातील कामात आपली पारदर्शकता असावी व सत्य मार्गाने योग्य काम आपण केली पाहिजेत. जे सीमेवरती लढताहेत ते आपल्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता दुष्मनांशी लढा देत आहेत. त्यांच्यामुळेच आपण देशामध्ये सुखी आहोत निवांत आहोत. त्यामुळे आपण पारदर्शकतेपणाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारचे कार्य केले तर ती खरी शहीद मेजर कौस्तुभ दादा यांना श्रद्धांजली असेल. त्यामुळे सर्वांनी योग्य मार्गाने काम करावे व आपल्या जबाबदाऱ्या समजून गांवातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे असे प्रतिपादन काळे यांनी केले.

यावेळी प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापक विनोद कर्पे यांनी ही आपल्या भाषणात जे सीमेवर ती लढत आहेत त्यांच्या कुटुंबाची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यांच्या कुटुंबाचा आपण सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन केले.

यावेळी गांवचे सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच अनंत जंगम, मेजर कौस्तुभ रावराणे यांचे कुटुंब सदस्य अनिल रावराणे, ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्या प्रियांका पाटील, ग्रामपंचायत सदस्या विशाखा काळे, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, सोसायटी चेअरमन संतोष भोसले, ग्रामसेवक प्रशांत जाधव, जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक श्री कर्पे, श्री कांबळे, श्री कुवर, श्री भैरळे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी श्री महेंद्रकर, आरोग्य सेवक बोडेकर, आरोग्य सेविका चाफे, सर्व अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!