नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे ‘हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे’ यांचा पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात देशभक्तीपर गीते, भाषण, रक्तदान शिबीर अशा विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, डॉ. डी. एम. सिरसट, कु. तुषार पार्टे, कुमारी प्रणिता फोंडके यांनी हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. हर्ष नकाशे आणि विद्यार्थ्यांनी देश भक्ती गीते सादर केले. ५०० विद्यार्थी- विद्यार्थीनींकडून हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या परिवाराला ५०० पत्र पाठवण्यात आली. हुतात्मा मे. कौस्तुभ राणे कुटुंब मित्र सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, रोटरी क्लब, वैभववाडी व राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भारतीय सैनिकांसाठी महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २२ रक्त दात्यांनी रक्तदान केले.