कणकवली | गणेश चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक संघटना सध्या अत्यंत शोकाकूल आहे. चिपळूण ओमळी येथील नाभिक समाजाची युवती दिवंगत निलीमा सुधाकर चव्हाण हिच्या अमानुष खूनाचा कायदेशीर मार्गाने न्याय निवाडा करण्यासाठी प्रशासनाला लेखी निवेदने देण्यात येत आहेत. मालवण नाभिक संघटने तर्फे चिपळूण ओमळी येथील नाभिक युवती निलीमा सुधाकर चव्हाण हिचा अमानुष पणे खून करणार्या नराधमाला शोधुन कठोर शिक्षा करावी यासाठी मालवण नाभिकांनी, घडलेल्या घटनेचा निषेध करत मालवण पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
कामावरुन गावी घरी येत असताना अचानक बेपत्ता झालेल्या दिवंगत निलीमा चव्हाण हिचा मृतदेह दाभोळ रत्नागिरी येथील खाडीत सापडला. आता याला आठवडा उलटत आल्याने
तपास यंत्रणेने लवकरात लवकर तपास करुन दोषींना कठोर शासन करावे व अन्यायग्रस्त चव्हाण कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच तपासाला गती यावी ही त्यांची निवेदनातून मागणी आहे. राज्यातुन विविध तालुकानिहाय नाभिक संघटनांनी पाठींबा देत या निंदनीय कृत्याचा निषेध केला आहे. अशी घटना किंवा असे वाईट प्रकार कोणावरही करण्याची नराधमांना हिंमत होऊ नये म्हणुन मालवण पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी नाभिक महामंडळाचे राज्य संघटक विजय सि. चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा सौ. प्रतिभाताई चव्हाण, तालुकाध्यक्ष भाऊ चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा दिपाली शिंदे, माजी तालुकाध्यक्ष आनंद आचरेकर, ता. युवाध्यक्ष संदीप लाड, महिला शहर अध्यक्षा सौ. कांचन कांता चव्हाण, सुर्यकांत चव्हाण, ललीत चव्हाण, अश्विनी आचरेकर, नितीन चव्हाण, निलेश चव्हाण, जगदिश वालावलकर, अंकुश चव्हाण, श्रावण विभाग अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, आचरा विभाग अध्यक्ष ओंकार आचरेकर, मसुरे विभागाचे प्रशांत चव्हाण, जेष्ठ नाभिक समाज कार्यकर्ते भाई चव्हाण व ३० पेक्षा अधिक नाभिक बंधु भगिनी उपस्थित होते.
या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना मालवण तालुका नाभिक संघटनेचे कार्यवाह शुभम लाड यांनी, ही घटना माणुसकीला कलंक आहे असे सांगत नाभिक संघटना विविध सामाजिक प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवत पाठपुरावा व जनजागृती करत राहील असे स्पष्ट केले. आपल्या दुर्दैवीपणे बळी पडलेल्या भगिनिला लवकरात लवकर न्याय मिळावा म्हणून सर्व समाज बांधव ठाम व एकत्र असल्याचे त्यांनी सांगितले.