25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ; मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे पोईप येथे प्रतिपादन.

- Advertisement -
- Advertisement -

पोईप येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जनजागृती कार्यशाळा संपन्न.

मसुरे | प्रतिनिधी : पिक विमा योजना आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वरदान अशी आहे त्यासाठी केवळ ७ दिवस शिल्लक असून आपण सर्वांनी या योजनेत सहभागी होऊन आपली निराशा टाळावी असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी येथे केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी कार्यालय मालवण यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालय पोईप येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शासनाच्या विविध योजना , प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना बाबत तसेच महाडीबीटी पोर्टल वरील विविध योजना याबाबत माहिती देऊन सहभाग नोंदविण्यास कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले.

यावेळी सरपंच श्रीधर नाईक, मालोंड सरपंच श्रीम.पुर्वा फणसगांवकर, तालुका कृषी अधिकारी श्री विश्वनाथ गोसावी, पोईप मंडळ कृषी अधिकारी डी. के. सावंत, कृषी पर्यवेक्षक श्री एस एस चव्हाण, कृषी सहाय्यक श्री एम बी कदम, श्रीम.चैताली साळकर ग्रामपंचायत सदस्य पोईप,श्री सिद्धेश गांवकर, श्री शुभम जाधव, श्री.वर्धम तसेच बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. यावेळी श्री सिद्धेश गांवकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बहुतांश शेतकरी ,बचत गट यांनी आपल्याकडे उत्पादित मालाला प्राधान्य देण्यासाठी प्रक्रिया उद्योग उभारून आपले आणि आपले कौटुंबिक जीवनमान उंचावेल यासाठी या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य कृषी विभागामार्फत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजना प्रतिनिधी शुभम जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पिक विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आपल्या नजीक बँका, सीएससी केंद्र यांच्याकडे जाऊन आवश्यकत्या कागदपत्रांची पूर्तता करावी विमा उतरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै असून त्यात्पूर्वी सर्व शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

उपस्थित शेतकऱ्यांना श्रीमती शोभा पांचाळ यांनी आपल्या शेतात केलेल्या एसआरटी भात लागवड पद्धतीचे मार्गदर्शन केले. प्रगतशील शेतकरी श्री सुरेश मापारी यांनी विविध उपक्रमाद्वारे आपण शेतीमध्ये कसे प्रगती साधू शकतो याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक श्री एस एस चव्हाण, आभार मंडळ कृषी अधिकारी डी. के. सावंत यांनी मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!