25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर कालवश ; हिंदी व मराठी सिनेमा आणि नाटकांतून केल्या होत्या भरीव भूमिका.

- Advertisement -
- Advertisement -

ब्युरो न्यूज | मुंबई : पुलंचा ‘अंतू बर्वा’ पुन्हा जागवलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. काल संध्याकाळपासून ते वेंटीलेटरवर होते.

जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या २० व्या वर्षी, १९५५ पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, रोहीत शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर व सिनेमात वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी याही नाटकांतून जयंत सावरकर यांनी वेगळा ठसा उमटवलेला होता. अलीकडच्या काळातील ‘सिंघम’ सिनेमा व ‘समांतर’ वेबसिरीज मध्येही त्यांनी चरित्र अभिनय केला होता. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेमा सृष्टीतील अनेक जणांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्युरो न्यूज | मुंबई : पुलंचा 'अंतू बर्वा' पुन्हा जागवलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे आज निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी अनेक नाटके, शंभरहून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले होते. काल संध्याकाळपासून ते वेंटीलेटरवर होते.

जयंत सावरकर आधी रंगभूमी आणि नंतर दूरचित्रवाणी आणि कालांतराने चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून घराघरात पोहचले. जयंत सावरकर यांचा जन्म ३ मे, १९३६ रोजी झाला. वयाच्या २० व्या वर्षी, १९५५ पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. सुरुवातीची बरीच वर्षे ते ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम करत होते. प्रारंभी हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी छोटी मोठी कामे केली आणि नंतर साहित्य संघाच्या नाट्यशाखेत कार्यरत असताना त्यांनी नाटकांत काम करण्याची मिळालेली संधी सोडली नाही. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. रंगभूमीवरील कलावंतांसाठी आजही दंतकथा असलेले केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, मामा पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य सावरकर यांना लाभले. आजच्या आघाडीच्या चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, रोहीत शेट्टी यांच्या दिग्दर्शनाखालीही सावरकरांना रंगमंचावर व सिनेमात वावरण्याची संधी मिळाली. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी याही नाटकांतून जयंत सावरकर यांनी वेगळा ठसा उमटवलेला होता. अलीकडच्या काळातील 'सिंघम' सिनेमा व 'समांतर' वेबसिरीज मध्येही त्यांनी चरित्र अभिनय केला होता. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेमा सृष्टीतील अनेक जणांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

error: Content is protected !!