राजेश द. राणे | शब्दांच्या रेषा : मागील काही वर्षात भारताच्या पश्चिम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. कारणे अनेक असतील पण नेमकी कारणे काय असावीत यांवर ‘वेळ काढून’ विचार करणे अत्यावश्यक आहे आणि त्या विचार करण्यात वेळकाढूपणा केला तर ते घातक ठरेल. मानवी हस्तक्षेपाने ही कारणे वाढली आहेत का? याचा शोध घ्यायला हवा.
मी कुणी भूगर्भ शास्त्रज्ञ नाही किंवा कुणी अधिकृत भौगोलिक अभ्यासक नाही. माझा जन्म कोकणातील एका खेडेगांवात झाला. पाऊस डोंगर,नदी-नाले, शेती हे सर्व मी जवळून अनुभवले आहे आणि आजही अनुभवतो आहे. हल्ली लोक जमिनी विकत घेतात आणि सुलभपणे शेती करता यावी म्हणून भुभागाचे सपाटीकरण करतात. परिणामी भुभागावर केलेली छेडछाड, दरडी कोसण्यास कारणीभूत ठरत असावी कारण भूभागावर सपाटीकरण केले की पावसाच्या पाण्याचे प्रवाह बदलतात . नकोत्या ठिकणी पाणी साचते, सपाटीकरण केलेल्या भागावर अनैसर्गिक रित्या साचते आणि मुरते, मुरलेले पाणी मग कुठेतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि मग दरडी कोसण्यास कारणीभूत ठरते. अजून एक कारण असावे की संपूर्ण भारतात रस्ते बांधायचे मोठमोठे हायवे बांधायचे काम सुरु आहे. त्यासाठी काही ठिकाणी बोगदे, चर, भराव करावा लागतो भूभागावर बरीच छेडछाड होत असते. विशेषतः बोगदे खणतांना दगड फोडण्यासाठी सुरुंग लावले जातात. त्याचा देखिल परिनाम जवळच्या भूक्षेत्रावर होत असावा. अशी अनेक कारणे असतील त्यात दगडीखाणी, भरमसाठ जंगलतोड असा मानवी हस्तक्षेप होत आहे. पाऊस काही आत्ताच जास्त पडतो असे नाही तो या पूर्वीही असाच पडत होता आणि असाच तो पडत राहिल. पाऊस पडेल दरडी कोसळत राहतील हे निसर्गचक्र असेच सुरु राहील. यावर ठोस उपाय योजना करायला हव्यात दरडी प्रवण क्षेत्रात कृतिम जाळ्या बसवणे हा काही कायम स्वरूपी उपाय होऊ शकत नाही. माझ्या सारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मनात आलेला विचार मी इथे मांडत तज्ञ्यांनी या वर सखोल अभ्यास करुन तो अंमलात आणावा इतकीच अपेक्षा.
मागील वीस वर्षाच्या काळात सरकारने वृक्षरोपण केले आहे. रस्त्याच्या दुतर्फा भरभर वाढणारी विलायती झाडे लावली तिच जर वड, पिंपळ, बांबु , कळक बांबु तथा इतर भारतीय वंशाची झाडे लावण्यावर भर दिला असता तर आज एक मजबुत जैविक भिंत तयार झाली असती. तसेच डोंगर उतारावर ही भारतीय वंशाची झाडे लावली तर मातील घट्ट पकडून ठेवायची ताकद या भारतीय वंशाच्या झाडांमध्ये आहे. पुढील पिढी साठी प्रत्येकाने सरकारची वाट न बघता आपल्या जबादारी पेक्षा आपल्या सुरक्षीततेचा विचार करून आपल्या घराशेजारील डोंगर उतारांवर जिथे माती कोसण्याची भिती आहे अशा ठिकाणी आपण ही कायमची जैविक उपाययोजना करु शकतो.
लेखन : श्री. राजेश द. राणे.
( सातरल-कणकवली / मुंबई )