23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

इर्शाळवाडी (इर्शाळगड) दुर्घटनेतील बाधितांचे कायमचं पुनर्वसन करणार :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

- Advertisement -
- Advertisement -

बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यांस प्राधान्य.

अलिबाग | ब्युरो न्यूज : इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत बचाव कार्य करणे व वाचलेल्या व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवणे यांस प्राधान्य दिले जात असून नियोजन झाले आहे. त्यांचे कायमचे पुनर्वसन करण्यासंदर्भात देखील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इर्शाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याला मार्गदर्शन व गती देण्याचे काम करत आहेत केले. त्यांनी सांगितले की , १२ लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे. या वाडीतील १०३ लोकांचे ओळख पटविण्यात आले आहे त्यापैकी ९० लोक सुरक्षित आहेत. जे जखमी आहेत त्यांच्यावर पनवेल एमजीएम रुग्णालयात उपचार चालू आहेत व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

बचाव कार्यात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की सतत पाऊस होत असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत हेवी मशिनरी व अवजार पोहोचण्यात अडचणी येत आहेत. दोन हेलिकॉप्टर तैनात केले गेले होते , परंतु ते खराब हवामानामुळे येथे पोहोचू शकलेले नाहीत, असे यावेळी मुख्यमंत्री श्री .शिंदे म्हणाले

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन येथे रात्रीपासून उपस्थित असून अधिकारी, रेस्क्यू टीम ही यांच्या संपर्कात रात्रीपासून होतो असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले . ते म्हणाले , बचाव कार्य करताना स्वतःचे जीव धोक्यात घालून या ठिकाणी काम करत आहेत. इथे मदत कार्य आणि बचावकार्य अवघड आहे, यात सहभागी स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तरीसुद्धा पाऊस असताना जे लोक ढिगार्‍याखाली अडकले आहेत त्यांना बाहेर सुरक्षित काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, असे माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!