25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चिंदरमध्ये सडेवाडी माळरानावर विजेचा धक्का लागून दगावली गाय ; मुक्या जनावरांच्या सर्वांगीण सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..!

- Advertisement -
- Advertisement -

प्रभारी सरपंच दीपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे व ग्रामस्थांनी घेतली घटनास्थळी तत्काळ धाव…!

प्रभारी सरपंच दीपक सुर्वे यांनी संबंधीत वीज यंत्रणेवर केला हलगर्जीपणाचा आरोप.

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथे पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या अनेक गुरं दगावण्याची घटना ताजी असतानाच चिंदरमधील एका शेतकरी बांधवाला त्याच्या डोळ्यांदेखत आपल्या गायीचा तडफडत होणारा मृत्यू पहायची घटना आज घडली. चिंदर साडेवाडी आज सकाळी तुटलेल्या विद्युत वाहिनीचा शॉक लागून दत्तात्रय ऊर्फ जयेश गोसावी यांची गाय जागीच दगावली तर माळरानवर फिरणारे दोन जंगली कोल्हे मृत झाल्याची घटना घडली.

याबाबत ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वीज वितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी हजर झालेल्या अधिकाऱ्यांना धरेवर धरत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. विद्युत मंडळाकडून तारांवरील मान्सून पूर्व डागडुजी तथा मेंटेनन्स न केल्यामुळेच असे हलगर्जीपणाचे प्रकार घडत असल्याचा आरोप चिंदर प्रभारी सरपंच दिपक सुर्वे यांनी केला आहे.

शेतीवर उदरनिर्वाह करणारे चिंदर साडेवाडी येथील दत्तात्रय ऊर्फ जयेश गोसावी हे गुरुवारी सकाळी चिंदर सडेवाडी माळरानवर आपली गुरे चारायला घेऊन गेले असता गु्रांमध्ये पुढे चालणारी गाय अचानक जमिनीवर पडून हंबरडा फोडत तडफडू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी पाहिले असता गाय वीज खांबावरून तुटून पडलेल्या तारेत अडकून तडफडत असल्याचे त्यांच्या ध्यानात आले ‌. प्रसंगावधान राखत त्यांनी मागे हटत बाकीच्या गुरांनाही मागे परतवले. काही क्षणातच त्यांच्या डोळ्यांदेखत गाय गतप्राण झाल्याने गोसावी अक्षरशः कोलमडून गेले. या दुर्घटनेची माहिती गोसावी यांनी ग्रामस्थांना देत विद्युत प्रवाह बंद करण्यास सांगितले. दुर्घटना समजताच चिंदर सरपंच दिपक सुर्वे, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, पोलीस पाटील दिनेश पाताडे, स्वप्नील गोसावी आदीदाखल झाले होते त्यांनी गोसावी यांना धीर देत तात्काळ वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच आचरा विद्युत मंडळाचे सहाय्यक अभियंता अनिल मठकर, परब, बांगर आदी उपस्थित झाले. आचरा पशुवैद्यकीय डॉ मिलिंद कांबळी हेही दाखल झाले होते.

चिंदर मध्ये नुकत्याच अनेक गुरांचा साथीने झालेल्या मृत्यूनंतर ची ही घटना पशूधन पालन, संवर्धन आणि इतर अनेक मुद्द्यांवर आता यंत्रणांनादेखील गांभिर्याने विचार करायला लावणारी आहे अशी प्रतिक्रिया शेती व पशूपालन अभ्यासकांमधून व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!