25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आमचा काम ‘देवचा’ पण किती ‘घेवचा’ ह्या ‘घेणा-या माणसान’ ठरवचा..!

- Advertisement -
- Advertisement -

देवेंद्र गावडे | उपसंपादक : आघाडिच्या फळीतले मुख्य पाचही फलंदाज ओळीने बाद व्हावेत प्रतिस्पर्धी संघाला विजयाची पूर्ण खात्री वाटावी आणि अचानक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाज कि गोलंदाज अशा काहीशा स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत असणा-या बहुधा हा ‘अष्टपैलू’ खेळाडू असावा असं इतरांनीच त्याला लेबल चिकटवून टाकलेले आहे अशा खेळाडूने धुवाँधार फलंदाजी करत स्वतःच्या संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढत सामना जिंकून द्यावा तसाच हा यंदाचा मानसून तथा ‘आपला पाऊस..!’

सुपरफास्ट एक्स्प्रेस मुळात पहिल्या फलाटावरून सुटायलाच उशिर झालेला असतो आणि तरी देखील पूढचा सगळा प्रवास ही एक्स्प्रेस नावाप्रमाणेच ‘सुपरफास्ट’करते म्हणजे वेळ मेक अप करत मागे राहिलेली वेळ भरून काढत अगदी नियोजित वेळी प्रवाशांना आपल्या अपेक्षित स्थळी पोहचवते तसा हा यंदाचा ‘आपला पाऊस….!’

जून महिना पूर्णपणे रखरखीत अवस्थेत संपला होता विहिर, नदी, ओढे यांचे ‘पाणी’ कधीच सुकून गेले होते म्हणून आता ‘तोंडचं पाणी’ सुद्धा ‘पळतंय’ की काय अशी अवस्था होऊ घातली होती पण ‘त्या’ची कृपा झाली आणि तो पुन्हा तसा तुफानीपणाने बरसला..! ‘तो’ यावर्षी एक महिन्याहून अधिक उशिराने आलाय असे सांगीतले तर आज कुणाचा विश्वास बसणार नाही इतक्या मुक्तपणे तो कोसळतोय..!

एका मराठी मनोरंजन वाहिनीवर सोमवारपासून एक मालिका ‘श्रीक्षेत्रपाल वेतोबा ‘ सुरू झाली आहे त्यात पहिल्याच भागात एक सुंदर संवादाची ओळ आहे. श्री देव वेतोबा म्हणतात,” आमचा काम ‘देवचा’..किती ‘घेवचा’..ह्या ‘घेणा-या’ माणसान ठरवक होया..!”

आतातरी ध्यानात येवकच होया….’माणसाच्या..!’

देवेंद्र गावडे ( उपसंपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

देवेंद्र गावडे | उपसंपादक : आघाडिच्या फळीतले मुख्य पाचही फलंदाज ओळीने बाद व्हावेत प्रतिस्पर्धी संघाला विजयाची पूर्ण खात्री वाटावी आणि अचानक सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या फलंदाज कि गोलंदाज अशा काहीशा स्वतःच गोंधळलेल्या अवस्थेत असणा-या बहुधा हा 'अष्टपैलू' खेळाडू असावा असं इतरांनीच त्याला लेबल चिकटवून टाकलेले आहे अशा खेळाडूने धुवाँधार फलंदाजी करत स्वतःच्या संघाला कठीण प्रसंगातून बाहेर काढत सामना जिंकून द्यावा तसाच हा यंदाचा मानसून तथा 'आपला पाऊस..!'

सुपरफास्ट एक्स्प्रेस मुळात पहिल्या फलाटावरून सुटायलाच उशिर झालेला असतो आणि तरी देखील पूढचा सगळा प्रवास ही एक्स्प्रेस नावाप्रमाणेच 'सुपरफास्ट'करते म्हणजे वेळ मेक अप करत मागे राहिलेली वेळ भरून काढत अगदी नियोजित वेळी प्रवाशांना आपल्या अपेक्षित स्थळी पोहचवते तसा हा यंदाचा 'आपला पाऊस….!'

जून महिना पूर्णपणे रखरखीत अवस्थेत संपला होता विहिर, नदी, ओढे यांचे 'पाणी' कधीच सुकून गेले होते म्हणून आता 'तोंडचं पाणी' सुद्धा 'पळतंय' की काय अशी अवस्था होऊ घातली होती पण 'त्या'ची कृपा झाली आणि तो पुन्हा तसा तुफानीपणाने बरसला..! 'तो' यावर्षी एक महिन्याहून अधिक उशिराने आलाय असे सांगीतले तर आज कुणाचा विश्वास बसणार नाही इतक्या मुक्तपणे तो कोसळतोय..!

एका मराठी मनोरंजन वाहिनीवर सोमवारपासून एक मालिका 'श्रीक्षेत्रपाल वेतोबा ' सुरू झाली आहे त्यात पहिल्याच भागात एक सुंदर संवादाची ओळ आहे. श्री देव वेतोबा म्हणतात," आमचा काम 'देवचा'..किती 'घेवचा'..ह्या 'घेणा-या' माणसान ठरवक होया..!"

आतातरी ध्यानात येवकच होया….'माणसाच्या..!'

देवेंद्र गावडे ( उपसंपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल )

error: Content is protected !!