जिल्ह्यातील क्रिडा संस्कृतीसाठी एक आनंददायी प्रोत्साहन….
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कालच आपली सिंधुनगरी चॅनेलच्या क्रिडा विभागाने दिलेल्या ,जिल्ह्यासाठीच्या गौरवास्पद अशा एका बातमीसारखीच त्याच बातमीची आणखीन एक बातमी समोर येत आहे.
क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या सेवेबद्दल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि.) मुंबई ह्या प्रतिथयश संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार २०२०, वेंगुर्ला दाभोली येथील आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल पंच अशोक दाभोलकर याना प्रदान करण्यात आला आहे.
सिंधुदुर्गाचे लाडके व्यक्तीमत्व व आजही क्रीडा संस्कृती तळागाळात रुजावी म्हणून आपली लेखणी, कार्याने सिंधुदुर्गाचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे क्रीडा महर्षी श्री. अशोक गणेश दाभोलकर-मेस्री यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
गेल्या अर्धशतकात एक सर्वसामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय पंच हा देशभर अवघड प्रवास करताना आपला अनुभव व क्रीडा विषय व नियमांचे बारकावे
आज फेसबुक माध्यमाव्दारे आपल्या लिखाणातून ते क्रीडा प्रेमींना उपलब्ध करून देत आहेत. अशोक दाभोलकरांच्या निवडी बद्दल वेंगुर्ले नगराध्यक्ष राजन गिरप,माजी जि प अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, वेंगुर्ला नगराध्यक्ष राजन गिरप, उद्योजक डॉ दीपक परब, मुंबई शूटिंग बॉल असो. सचिव दीपक सावंत,
राजेंद्र सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा शुटिंगबॉल अध्यक्ष संजय कदम, भाजप मालवण महिला अध्यक्ष सौ लक्ष्मी पेडणेकर,पत्रकार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे.
अशाप्रकारे विविध क्षेत्रांतून व विविध तालुक्यातून श्री.अशोक दाभोळकर यांचे होणारे अभिनंदन हे संपूर्ण क्रिडाक्षेत्राला आनंददायी असेच आहे.
श्री अशोक दाभोळकर यांचा क्रिडा क्षेत्रातून सामाजिक कार्य ,तंदुरुस्ती व खेळाडुंची कारकिर्द शालेय वयातूनच घडवायला लागायच्या उद्देशाने आता जिल्ह्यात क्रिडा संस्कृती अतिशय व्यावसायिक व व्यापकपणे जोपासली जाईल अशी श्री.अशोक दाभोळकर यांनीही आशा व्यक्त करुन आपली सिंधुनगरी चॅनेल व सर्व मान्यवरांचे आभार मानले आहेत.
आपल्या सर्वांचे मन:पुर्वक आभार. हे ऋण मी विसरु शकत नाही.