24.6 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसाला आ. भास्कर जाधवांची प्रमुख उपस्थिती ; जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांमध्ये उत्कंठावर्धक चैतन्य.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार भास्कर जाधव यांचे सकाळी विजय भवनात होणार स्वागत ; आमदार वैभव नाईक यांचीही असणार विशेष उपस्थिती.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे सुपुत्र तसेच कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष, शिवसेना युवानेते संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या शुक्रवारी १४ जुलैला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घणाघाती नेते आमदार भास्कर जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कणकवलीत त्यांच्या शब्दांची धडाडती तोफ अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक व युवा सैनिक तसेच युवती सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठावर्धक चैतन्य आहे. आमदार भास्कर जाधव यांचे सकाळी १०:३० वाजता कणकवली विजय भवन येथे स्वागत केले जाणार आहे. सकाळी ११ वाजता कणकवली भगवती मंगल कार्यालय येथे संदेश पारकर यांच्या वाढदिवस कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ०१:३० ते ०२:०० वा. पर्यंत कणकवली विजय भवन येथे कणकवली विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. तर संध्याकाळी ०४ वाजता विजय भवन येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची ते भेट घेणार आहेत.

युवा नेते संदेश पारकर यांचा वाढदिवस कणकवलीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!