शिरगांव | प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील नेरुर येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद चौधरी यांच्या आईच्या २२ व्या पुण्यतिथी निमित्त येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता चित्रकलेची रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत जिल्हयातील १२६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे, पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी ते सातवी, आणि आठवी ते दहावी असे चार ग्रुप करण्यात आले होते प्रत्येक ग्रुप मधून तीन स्पर्धकांना विजेते म्हणून घोषित करण्यात येवुन, विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रस्टतर्फे, प्रशस्तीपत्र, चित्रकला साहित्य व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गट पहीला, विजेते – १)यज्ञेश शिशुपाल पारकर, २) वैदेही अमित वळंजु, ३) आरोही चंद्रकांत कदम. गट दुसरा विजेते १) रजुल योगेश सातोसे, २) अविष्कार चंद्रकांत कदम, ३) मयुरेश महेश हवालदार. गट तिसरा विजेते १) तन्मय पुरुषोत्तम नेरुरकर, २) वेदांत सचिन तवटे, ३) आदित्य चारुदत्त सावंत. गट चौथा विजेते – १) ऋग्वेद कुसाजी कांबळी, २) देवांग वासुदेव जोशी, ३) दिगंबर रामचंद्र आंबेरकर.
विजेत्यांना प्रशस्तीपत्र, चित्रकलेकरिता लागणारे साहित्य व स्मृतिचिन्ह देऊन, मान्यवरांतर्फे गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर व देवगड तालुक्यातील मुणगी येथील विद्यालयाच्या कला शिक्षिका गौरी तवटे यांनी जबाबदारी पार पाडली.
यावेळी ट्रस्टतर्फे वसुंधराचे संस्थापक सतीश नाईक यांचा शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला, तसेच वसुंधरा विज्ञान संस्थेला ट्रस्टतर्फे दहा हजार रुपयाची देणगी देण्यात आली. विद्यार्थ्यांना ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी, सचिव संदीप साळस्कर, वसुंधरा केंद्राचे व्यवसथापक सतीश नाईक, संतोष नाईक यांनी मार्गदर्शन केले. याच दरम्यान वालावल मधील अंगणवाडी शाळेतील मुलांना छोट्या स्कूलबॅग देण्यात आल्या.
स्तुत्य उपक्रम, अभिनंदन.