25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मसुरे देऊळवाडा शाळेत २४ विध्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप ; माजी पं. स. सदस्य महेश बागवे यांचे दातृत्व

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवातील देऊळवाडा शाळेत माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी विद्यार्थी वर्गाला देणगी स्वरुपात मदतीचा हात दिला. “या शाळेने मला घडवले, मला मानसन्मान दिला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणवेश वाटप करताना मला खूप धन्य झाल्यासारखे वाटते,” असे उद्गार माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे यांनी मसुरे देऊळवाडा शाळेतील गणवेश वाटप कार्यक्रमात बोलताना काढले.

श्री. महेश बागवे हे देऊळवाडा प्राथमिक शाळेतील शालेय गणवेश लाभार्थी नसलेल्या विद्यार्थ्यांना आपली आई कै. शारदा राजाराम बागवे यांच्या स्मरणार्थ गेली पंधरा वर्षे सातत्याने गणवेश वाटप करीत आहेत. यावर्षी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या देणगीतून गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सुरेखा वायंगणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, ग्रा.पं. सदस्य श्री. चंद्रकांत राणे, श्री. विलास मेस्त्री, गणेश बागवे, निलेश नाईक, गणेश भोगले, दिनेश मेस्त्री, संतोष अपराज, सौ. सुप्रिया मेस्त्री, सौ. सारिका आमडोसकर, सौ. उन्नती मेस्त्री, सौ. गौरी मेस्त्री, सौ. सेजल सावंत, सौ. कविता सापळे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे गांवातील देऊळवाडा शाळेत माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी विद्यार्थी वर्गाला देणगी स्वरुपात मदतीचा हात दिला. "या शाळेने मला घडवले, मला मानसन्मान दिला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणवेश वाटप करताना मला खूप धन्य झाल्यासारखे वाटते," असे उद्गार माजी पंचायत समिती सदस्य श्री. महेश बागवे यांनी मसुरे देऊळवाडा शाळेतील गणवेश वाटप कार्यक्रमात बोलताना काढले.

श्री. महेश बागवे हे देऊळवाडा प्राथमिक शाळेतील शालेय गणवेश लाभार्थी नसलेल्या विद्यार्थ्यांना आपली आई कै. शारदा राजाराम बागवे यांच्या स्मरणार्थ गेली पंधरा वर्षे सातत्याने गणवेश वाटप करीत आहेत. यावर्षी २४ विद्यार्थ्यांना त्यांच्या देणगीतून गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. सुरेखा वायंगणकर, व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. सदानंद कबरे, मुख्याध्यापक श्री. प्रशांत पारकर, ग्रा.पं. सदस्य श्री. चंद्रकांत राणे, श्री. विलास मेस्त्री, गणेश बागवे, निलेश नाईक, गणेश भोगले, दिनेश मेस्त्री, संतोष अपराज, सौ. सुप्रिया मेस्त्री, सौ. सारिका आमडोसकर, सौ. उन्नती मेस्त्री, सौ. गौरी मेस्त्री, सौ. सेजल सावंत, सौ. कविता सापळे, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!