शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील गवाणे प्राथमिक शाळा विद्यार्थांनी शारदोत्सवात केले आगळ्यावेगळ्या पध्दतीने
सजावट करत टाकाऊ कागदा पासून देवी सरस्वतीच्या मागे मोबाईल असा देखावा दाखवला आहे. कारण मोबाईल मुळे अभ्यास होत नाही हे त्यातून संदेश दिला आहे. बाजूला दोन प्रकारे पाट्या मुलाची वाट पाहत आहेत त्यावर अभ्यास केला पाहिजे. बरे झाले की शाळा चालू झाली. कारण गावात रेंज नाही. ग्रामीण भाग असल्यामुळे काही कारणामुळे मोबाईल घेता येत नाही. म्हनूनच बरे झाले शाळा चालू झाल्या. असा एक नाविन्यपूर्ण संदेश देण्याचा प्रयत्न मुलांनी केला आहे. सर्व शिक्षक,उप अध्यक्ष अनंत आयरे
अक्षय मेस्त्री,ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी उपस्थित होते. या मुलांच्या स्तुत्य उपक्रमास सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि कौतुक केले.