संकटात असलेल्या शेतकरी वर्गाच्या मागे कर्जवसुलीचा तगादा नको असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅन्कांना केले सूचीत.
मालवण | सुयोग पंडित : गेले आठवडाभर महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी शेतकरी वर्ग व इतर समस्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. यामुळे महाराष्ट्र राज्यातील मूलभुत अत्यावश्यक प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष वळवण्याचा सकारात्मक सामाजिक प्रयत्न मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी केला आहे अशी प्रतिक्रिया समाज व राजकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ ग्रस्त व अवकाळी पावसाने त्रस्त असणार्या शेतकरी वर्गाच्या मागे कर्जवसुलीचा वसुलीचा तगादा लावू नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बॅन्कांना दिले आहेत. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी काल शुक्रवारी या संदर्भात ‘वर्षा’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्र यावे अशी चर्चा सुरू असतानाच शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ही चर्चेची ठरत आहे. मनसे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केली नसून येणार्या मेळाव्यात याबाबत ते बोलतील असे त्यांनी पत्रकारांना या पूर्वीच सांगितले होते.
नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत असल्याचा मुद्दा तसेच वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास आणि इतर विषयांवर राज यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली.