माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि सद्य उपसरपंच अविराज परब यांनी घेतला होता आक्रमक पवित्रा.
आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवच्या बि एस एन एल संचार सेवेमध्ये गेला काही काळ वारंवार अडथळे येत होते. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि सद्य उपसरपंच अविराज यांनी या संदर्भात मालवणच्या बि.एस एन एल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. दिनांक ४ जुलैला दुपारी ही बातमी ‘आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल’ ने आपल्या वेब पोर्टलवरुन प्रसारित केल्या नंतर अवघ्या २ दिवसांत पळसंब मधील बि एस एन एल संचार सेवेची जुनी यंत्रणा बदलून काही दुरुस्त्या करत संचार सेवा पूर्ववत केली आहे.
या बद्दल माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर आणि सद्य उपसरपंच अविराज यांनी BSNL विभागीय अधिकारी श्री. कवडे आणि संबंधित कर्मचारी व अधिकार्यांचे समाधान व्यक्त करुन गांवाच्या वतीने आभार मानले आहेत.