कणकवली |उमेश परब : भिरवंडे (परतकाम वाडी) गावचे सुपुत्र, माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनियर कॉलेज कनेडी चे माजी विद्यार्थी, लकी जनरल स्टोअर्स कनेडी चे मालक तसेच सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गणेश शांताराम खांबल यांनी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. एम्. एम्. सावंत ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, श्री. तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि बालमंदिर कनेडी या प्रशालेतील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आठ हजार रुपये किंमतीच्या वह्या प्रशालेचे मुख्याध्यापक सुमंत दळवी यांच्याकडे नुकत्याच प्रदान केल्या आहेत.
प्रशालेत येणारी मुले ही बहुतांश ग्रामीण भागातील आहेत. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी त्यांना रोजच्या वापरासाठी लागणा-या वह्या सुद्धा विकत घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी या वह्यांचे वाटप प्रशाले मार्फत करण्यात येणार आहे.
गणेश खांबल यांच्या या दातृत्वाबद्दल क. ग. शि. प्र. मंडळ, मुंबईचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व सर्व पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन एल. डी सावंत व सर्व सदस्य, प्रशाला मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी गणेश खांबल यांचे आभार मानले.