आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील ‘चिंदर सेवा संघ’ यांनी नियमीतपणे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्यावतीने कृषी मार्गदर्शन शिबीर, रक्तदान शिबिर या कार्याची दखल घेत चिंदर सेवा संघाला नुकतेच ‘पर्यावरण प्रेमी’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री, सचिव सिध्देश गोलतकर, खजिनदार गणेश गोगटे, उपाध्यक्ष विवेक परब यांनी या पुरस्काराचा स्विकार केला.
सचिव सिध्देश गोलतकर यांनी संघाच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत माहिती दिली व आगामी उपक्रमांची माहिती दिली. या पुरस्काराचे श्रेय चिंदर सेवा संघाचे माजी अध्यक्ष संदिपभाई पारकर यांचे व संघातील सहकार्याचे असून हा पुरस्कार त्यांनी संदिपभाई पारकर यांना समर्पित केला.
कुडाळ येथील मराठा हॉल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात चिंदर सेवा संघाला सन्मानचिन्ह, तुळशीचे रोप देवून मान्यवर पंचम खेमराज विद्यालयाचे निवृत्त शिक्षक सुभाष गोवेकर व पास्कल रॉड्रीग्ज यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. चिंदर सेवा संघ गेली ५ वर्षे रक्तदान शिबिर, कृषीमार्गदर्शन, भगवंतगड किल्ल्यावर छत्रपती शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा असे उपक्रम घेत आहे. या कार्यांची दखल घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग यांनी त्यांना सन्मानित केले आहे..
यावेळी व्यासपीठावर संदेश किंजवडेकर, कुडाळ तालुका गट शिक्षणा अधिकारी, विनायक परब, सिंधुदुर्ग जिल्हा परब मराठा समाज, पर्यावरण तज्ञ डॉ. बापू अशोक भोगटे , रामचंद्र परब- संघटक – परब मराठा समाज कोकण विभाग अध्यक्ष बापू परब, जोईल डिस्लील्वा, सुभाष गोवेकर- निवृत्त शिक्षक पंचमखेमराज आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण, रक्तदान विषयक कार्ये करणाऱ्या संस्थाना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू परब यांनी तर आभार श्री गावडे यांनी मानले. चिंदर सेवा संघाच्या या सन्मानाबद्दल त्यांची जिल्ह्यात स्तरांतून प्रशंसा होत आहे.