23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

अजित यांच्याकडे आता राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी ; उत्तर विभागातून उल्लेखनीय नांव पुढे येत नसल्याने झाली थेट निवड.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित (क्रिडा वृत्त) : १९९७ सालापासून जवळपास दिड दशक नियमितपणे भारतीय क्रिकेट संघ, मुंबई रणजी संघ, कोलकाता नाईट रायडर्स व दिल्ली डेअरडेव्हील्स साठी १५० कि.मी. प्रती तासाने भेदक गोलंदाजी करणार्या अजित आगरकर यांच्याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने खेळाडू निवड स्तरावरील सर्वात मोठी जबाबदारी सोपवली आहे. अजित आगरकर यांना मोठी जबाबदारी सोपवताना भारतीय क्रिकेट संघाचे निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेली क्रिकेट सल्लागार समितीने अजित आगरकर याची मुलाखत घेतली त्यानंतर त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. याआधीही अजित आगरकर यांनी या पदासाठी अर्ज केला होता पण तेंव्हा चेतन शर्मा यांची वर्णी लागली होती.

भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे, या दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय व टी-२० सीरिज होणार आहे. यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची आधीच निवड झाली आहे पण टी-२० मालिकेसाठी अजून संघाची घोषणा झालेली नाही. या संघाची निवड अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

अजित आगरकर यांची एकट्याचीच मुलाखत झाली व ती मुलाखत अजित आगरकर परदेशामध्ये असल्यामुळे ही ऑनलाईन घेण्यात आली. उत्तर विभागातून कोणतेही उल्लेखनीय नाव नसल्यामुळे आगरकर यांची थेट नियुक्ती सोपी झाल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. आगरकर यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम विभागामध्ये २ निवड समिती सदस्य झाले आहेत. आता पश्चिम विभागामधून सलिल अंकोला, अजित आगरकर, मध्य विभागामधून सुब्रतो बॅनर्जी, दक्षिण विभागातून एस शरथ आणि पूर्व विभागातून एसएस दास निवड समिती सदस्य आहेत.

अजित आगरकर यांनी २६ कसोटी, ४ टी-२० आंतरराष्ट्रीय आणि १९१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. १९९९, २००३ आणि २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धांमध्ये ते भारतीय संघात होते व २००७ सालच्या टी-२० जगज्जेत्या संघातही अजित आगरकर यांचा समावेश होता. एकदिवसीय सामन्यात सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम अजित आगरकरच्या नावावर आहे. याशिवाय आगरकरने लॉर्ड्सवर कसोटी सामन्यात ऐतिहासिक शतक झळकावले आहे. गेले एक दशक ते समालोचन व प्रशिक्षण यांद्वारे आधुनीक क्रिकेटशी नियमीत संलग्न आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!