कणकवली | उमेश परब : गवाणे या गावातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवीची वेगवेगळी अठरा रूपे साकारली आहेत. आपल्या देशात असामान्य आणि कर्तुत्व गाजवणाऱ्या जगात वेगळा ठसा उमटविलेल्या नऊ कर्तृत्ववान महिलांचे रूप साकारून वेगळ्याच पद्धतीने नवरात्रीत महिलाशक्तीचा जागर केला. युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने 4×15 फूट आकाराच्या कॅनव्हासवर अँक्रेलिक कलरने देवीची नऊ रुपे साकारलीत यामध्ये देवीची नऊ रूपे आहेत आणि आधुनिक कर्तुत्ववान नऊ स्त्रियायांचे रेखाटन केले आहे.
यामध्ये सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, अंबाबाई, काली, सीता, राधा, रुक्मिणी, दुर्गा तर आधुनिक कर्तृत्ववान स्त्रिया सिंधुताई सपकाळ, पी. व्ही. सिंधू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, आनंदी गोपाळ जोशी, लता मंगेशकर, सावित्रीबाई फुले, मादाम कामा, मदर तेरेसा, यांचा समावेश आहे. ही सर्व चित्रे युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने गवाने येथील घरी प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. ही सर्व चित्रे साकारायला त्याला सुमारे 20 ते 25 दिवसांचा कालावधी लागला. अशा सर्व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी अक्षयने नऊ महिलांचे चित्र साकारले आहे. यातून देशाच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा हिच त्याची संकल्पना असल्याचे अक्षय मेस्त्री यांनी सांगितले.